मुंबई: हार्दिक पांड्याने ख्रिसमसच्या वेळी एक फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं. हार्दिक पांड्याची पत्नी पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चा या फोटोंमुळे रंगली होती. पांड्या दुसऱ्यांदा बाबा होणार अशी चर्चा सुरू असतानाच एक मोठी अपडेट यावर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या आणि त्याची जोडीदार नताशा स्टॅनकोविक यांनी त्यांच्या घरी कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला होता. यादरम्यान नताशाने प्लम कलरचा बॉडी फिटेड वेल्वेट ड्रेस परिधान केला होता. ज्यामध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत होता.


हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा बाप होणार आहे का? नताशा स्टॅनकोविचचा फोटो पाहून सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच चर्चा रंगली. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक प्रेग्नंट आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. पण यादरम्यान अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकच्या एका मैत्रिणीने तिच्या प्रेग्नेंसीवर खुलासा केला आहे.


नताशा प्रेग्नंट आहे की नाही याबाबत तिला अद्याप माहिती नाही. मात्र हार्दिक पांड्या आणि नताशा सध्या दुसऱ्या मुलाचा विचार करत नाहीत. हे मैत्रिणीनं स्पष्ट सांगितलं आहे. यावर नताशाला काही बोलायचंही नाही. त्यामुळे हार्दिक कदाचित या चर्चांना उत्तरं देऊ शकतो. 


वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर हार्दिक आणि नताशा यांनी 2020 च्या सुरुवातीला लग्न केलं. 2020 मध्ये हार्दिकची पत्नी नताशा हिने एका मुलाला जन्म दिला, त्याचे नाव अगस्त्य ठेवलं आहे. नताशा लग्नाआधीच गरोदर राहिली होती. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान गुपचूप लग्न केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 


 



आता हार्दिक पांड्या या फोटोवर आपलं मौन कधी सोडणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे तो काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष आहे.