Shakib Al Hasan Video: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशाच्या टीमला काही साजेशी कामगिरी करता आली नाही. टाईम आऊटच्या वादामुळे बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल हसन चांगलाच चर्चेत आला होता. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, असा दावा केला जातोय की, वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर शाकिब अल हसनला मायदेशी परतल्यावर मारहाण करण्यात आलीये. या व्हिडीओमध्ये शाकिबला मारहाण केल्याची दृश्य दिसून येतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बांगलादेश टीमचा कर्णधार शाकिब अल हसनला काही लोकं मारहाण करताना दिसतायत. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये शाकिबला जमिनीवर खेचण्याची दृश्य देखील दिसतायत. वर्ल्डकपमधील कामगिरीनंतर चाहत्यांनी संतापून हे कृत्य केल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे, हे जाणून घेऊया.


काय आहे या व्हिडीओमधील सत्य?


मुख्य म्हणजे, हे खरं आहे की, व्हिडिओमध्ये शाकिबसोबत मारहाण झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाकिब अल हसनला काही लोक धक्काबुक्की आणि मारहाण करताना दिसतायत. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, वर्ल्डकपमधील खराब कामगिरीमुळे शाकिबला बांगलादेशमध्ये अशा वागणुकीचा सामना करावा लागला आहे. मात्र हे चूक आहे.


खरं तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूप जुना आहे. हा व्हिडिओ बांगलादेशचा नसून हा व्हिडिओ दुबईचा आहे. दुबईमध्ये शाकिब अल हसनसोबत असं कृत्य करण्यात आलं होतं. 


अनेक फॅक्ट चेक एजन्सींच्या माध्यमातून हा व्हिडीओची सत्यता पडताळण्या आली.



सर्व पडताळणी करून असं लक्षात आलं की, हा व्हिडीओ जुना असून 2022 मधील दुबईमध्ये घटनेचा आहे. 2022 साली शाकिब अल हसनला दुबईमध्ये मारहाण झाली होती आणि त्याच घटनेचा हा व्हिडीओ आहे. 


व्हिडिओमध्ये दिसणारी ही घटना 2022 मध्ये दुबईमध्ये ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनावेळी घडली होती. ज्वेलरी शोरूम मालकाच्या मुलाशी शाकिब बोलत होता. यावेळी काही लोकं शाकिबकडे आले आणि त्याच्याशी बोलू लागले. याचवेळी हा वाद झाला आणि त्यानंतर त्यांनी शाकिबला धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली.


ही घटना 2022 मध्ये घडली होती आणि त्यावेळी तो दुबईत होता. त्यावेळी शाकिबच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र या दरम्यान वाद झाला. या नंतर तिथल्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर मी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. 


सध्या या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ सध्या असून बांगलादेशच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतरचा राग लोकांनी व्यक्त केला आहे. मात्र खरं तर हा व्हिडीओ जुना आहे.