Fact Check : भारताची धावपटू Duti Chand खरंच अडकली विवाहबंधनात, नक्की काय आहे सत्य?
क्रीडा विश्वामध्ये दुती ही पहिलीच खेळाडू आहे जिने उघडपणे आपले समलैंगिक संबंध असल्याचं जाहीर केलं होतं.
Trending Duti Chand Fact Check : भारताची धावपटू दुती चंद (Runner Duti Chand) ने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सगळीकडे अशी चर्चा आहे की दुतीने तिच्या असणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत लग्न केलं आहे. मात्र खरच दुती विवाह बंधनात अडकली आहे की नाही ते जाणून घेऊयात.
या फोटोमध्ये दुती आणि तिची जोडीदार स्टेजवर बसलेले दिसत आहेत. दुतीने सूट घातला आहे, तर तिच्या जोडीदाराने लेहेंगा घातला आहे. अनेक वर्षांपूर्वी जगासमोर आपल्या नात्याची कबुली देणाऱ्या दुतीचे फोटो पाहून तिने लग्न केल्याचे दिसते. अनेक माध्यम संस्थांनीही अशा बातम्या पोस्ट केल्या आहेत, पण हे खरे आहे का?
इन्स्टाग्रामवर 1.1 मिलिअनपेक्षा जास्त फॉलोवर्स असून जे फोटो शेअर केले आहेत ते तिच्या बहिणीच्या लग्नातील आहेत. हेच फोटो दुतीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दुतीच्या मैत्रिणीच्या नाव मोनालिसा असं आहे. दोघांनी फोटो व्हायरल झाला आहे मात्र दुतीचं लग्न झालेलं नाही. कारण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
दुतीने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, माझं आधीही तुझ्यावर प्रेम होत, आताही आहे आणि कायम राहिल, असं म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी समलिंगी संबंध असल्याचं दुतीने जाहीर केलं होतं. मात्र त्यावेळी तिने तिच्या पार्टनरबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. मला कोण काय म्हणेल याची मला पर्वा नसल्याचं दुती म्हणाली होती. तिने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून दुतीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.