ओव्हल : द. आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार विजयासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. निराशाजनक कामगिरीमुळे ऑफ्रिकेच्या संघाला स्पर्धेबाहेर जावे लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यातील द. आफ्रिकेच्या कामगिरीवरुन त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. यात सर्वाधिक टीका फाफ डू प्लेसिसवर होतेय. आफ्रिकेच्या पराभवासाठी प्लेसिसला जबाबदार ठरवले जातेय.


प्लेसिसने ३६ धावा केल्या मात्र जेव्हा डेविलियर्स आणि मिलर बाद झाले तेव्हा तो क्रीजवर होता. सोशल मीडियावर एका चाहत्याने प्लेसिसचा फोटो शेअर करताना म्हटलेय, भारताने आफ्रिकेला ८ विकेटनी हरवलेय. ८.२ ओव्हरमध्ये ३ विकेट मिळवल्या होत्या. त्यामुळे मॅन ऑफ दी मॅचचा खिताब मिळवला.


ज्यावेळी प्लेसिस फलंदाजी करत होता तेव्हा ७६ वर एक बाद अशी आफ्रिकेची धावसंख्या होती. ज्यानंतर क्विंटन डी कॉक ११६ धावांवर बाद झाला. यानंतर डेविलियर्स खेळण्यासाठी उतरला. मात्र प्लेसिसच्या कॉलवर डेविलियर्स धावला आणि पांड्याच्या थ्रोचा शिकार ठरला.


त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये डू प्लेसिस आणि मिलर यांच्यात ताळमेळ नसल्याने मिलर रनआऊट झाला. यावेळीही चूक प्लेसिसची होती. काही वेळानंतर प्लेसिस स्वत: बाद झाला.