LIVE सामन्यात पोलार्डने काढली डुप्लेसिसची खोड, रागाने लालबुंद झाला अन्... पाहा Video
Faf du Plessis Upset with Kieron Pollard : एमआय केपटाऊन आणि जॉबर्ग सुपर किंग्ज सामन्यात (MICT vs JSK SA20) पोलार्डने असं काय केलं, ज्यामुळे फाफ डुप्लेसिसला लाईव्ह सामन्यात राग आला. नेमकं प्रकरण काय? पाहुया...
MICT vs JSK SA20 clash : साऊथ आफ्रिका टी-ट्वेंटी लीगमध्ये (SA20) रोमांचक सामन्यांचा थरार पहायला मिळत आहे. अशातच 29 जानेवारी रोजी एमआय केपटाऊन आणि जॉबर्ग सुपर किंग्ज (MICT vs JSK) यांच्यात एक अप्रतिम सामना पाहायला मिळाला. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर हा सामना खेळला जात होता. या सामन्यात पावसाने ख्वाडा घातल्याने फक्त 8 ओव्हरचा सामना खेळवला गेला. मात्र, या सामन्यात एमआय केपटाऊनचा कॅप्टन कायरन पोलार्ड याने रंगत आणली. पोलार्डने (Kieron Pollard) असं काय केलं, ज्यामुळे फाफ डुप्लेसिसला (Faf du Plessis) लाईव्ह सामन्यात राग आला. नेमकं प्रकरण काय? पाहुया...
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सर्वात मोठा संघर्ष असतो. अशातच या दोन्ही संघाच्या प्रतिकात्मक टीमची रिव्हायलरी देखील साऊथ अफ्रिकन टी-ट्वेंटी लीगमध्ये पहायला मिळते. एमआय केपटाऊन आणि जॉबर्ग सुपर किंग्ज यांच्यात नेहमी अतितटीचे सामने पहायला मिळतात. अशातच सोमवारी झालेल्या सामन्यातील वातावरण काहीसं तापल्याचं दिसून आलं.
झालं असं की... एमआय केपटाऊनने 8 षटकांत तीन गडी गमावून 80 धावा केल्या होत्या, पावसामुळे सामना मध्यभागी थांबवावा लागला. खेळास उशिर झाल्याने डकवर्थ लुईस नियमांनुसार जॉबर्ग सुपर किंग्जला 8 ओव्हरमध्ये 98 धावांचं आव्हान मिळालं होतं. सलामीवीर फाफ डुप्लेसिस आणि लाऊस जुप्लॉय यांनी धमाकेदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 57 धावा कुटल्या. त्यामुळे आता एमआयचा कॅप्टन कायरन पोलार्ड याने डुप्लेसिसची खोड काढली.
पाहा Video
कागिसो रबाडा पुढचे षटक टाकायला आला तोपर्यंत पाऊस सुरू झाला होता. सामन्याला उशीर करण्यासाठी पोलार्डने रबाडाला चेंडू टाकण्यापूर्वी बोलावले आणि तो चेंडू टाकू शकला नाही. याबाबत फाफ डू प्लेसिस चांगलाच संतापलेला दिसला. त्यावेळी त्याने थेट नाराजी देखील व्यक्त केलीये. जोबर्ग सुपर किंग्सला विजयासाठी 30 चेंडूत फक्त 41 धावांची गरज होती.
दरम्यान, अखेरीस फाफ डुप्लेसिस आणि लाऊस जुप्लॉय यांनी विकेट न गमावता सामन्याचा शेवट केला अन् जोबर्ग सुपर किंग्स यांनी हा सामना 10 विकेट्सने खिशात घातला.