जाधवनंतर या खेळाडूने वाढवले धोनीचे टेन्शन
दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने टी-२०मधील पहिल्या सामन्यात मुंबईवर एका विकेटने मात करत विजयी सलामी दिली. चेन्नईचा पुढचा सामना आज कोलकाताविरुद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीचे टेन्शन वाढलेय.
मुंबई : दोन वर्षाच्या बंदीनंतर चेन्नईने टी-२०मधील पहिल्या सामन्यात मुंबईवर एका विकेटने मात करत विजयी सलामी दिली. चेन्नईचा पुढचा सामना आज कोलकाताविरुद्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी महेंद्र सिंग धोनीचे टेन्शन वाढलेय.
पहिल्या सामन्यात मॅच विनिंग शॉट खेळणारा केदार जाधव मांसपेशी खेचल्या गेल्याने दुखापतग्रस्त झालाय. त्यामुळे तो या स्पर्धेत पुढे खेळू शकणार नाहीये. मात्र जाधवनंतर आता आणखी एका खेळाडूच्या फिटनेसची चिंता धोनीला सतावतेय.
फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाहेर होऊ शकतो. चेन्नईचे फलंदाजीचे कोच मायकेल हसी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मांसपेशी खेचल्या गेल्याने तसेच बोटामध्ये छोटा फ्रॅक्चर आहे. आशा आहे की तो मोहालीमध्ये पंजाबविरुद्धच्या सामन्यात उतरेल.
ते पुढे म्हणाले, मला वाटते डू प्लेसिस पूर्णपणे सराव सामन्यात भाग घेत नाहीये. मांसपेशी खेचल्या गेल्यात तसेच त्याच्या बोटालाही फ्रॅक्चर झालेय. पुढील आठवड्याभरात तो सराव सुरु करेल.
केदार जाधवही बाहेर
धोनीच्या चेन्नईला पहिल्या टी-20नंतरच मोठा धक्का बसला. केदार जाधव हा मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धा खेळू शकणार नाही. मुंबई विरुद्धच्या मॅचमध्येच केदार जाधव दुखापतग्रस्त झाला होता. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नईनं मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या बॉलवर एक विकेट राखून चेन्नईनं मुंबईला पराभूत केलं. चेन्नईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ड्वॅन ब्राव्हो आणि केदार जाधव. ब्राव्होनं ३० बॉल्समध्ये ६८ रन्सची खेळी केली तर केदार जाधवनं २२ बॉल्समध्ये २४ रन्स केले.