नवी दिल्ली : पाकिस्तानचा ओपनर फखर झमानने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराह बद्दल मोठा खुलासा केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा जमाने सांगितले की, या सामन्यात भारतीय संघाचे काही खेळाडू विशेषतः विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह यांनी स्लेजिंग केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झमान याने सांगितले की, भारतीय खेळाडूंनी काय केलं. तो बोलला की, 'त्यावेळी मी आणि अजहर अली बॅटिंग करत होतो. तेव्हा कोहली वारंवार बोलत होता की एक विकेट काढ, तर हे सर्व आऊट होऊन जातील. फक्त एक विकेट काढ.'


झमानने सांगितलं की, बूमराह देखील यामध्ये मागे नव्हता. त्यांच्या बॉलवर मी आऊट झालो होतो पण तो नो बॉल होता. तेव्हा तो बोलला की जरा पुढे पण रन काढ. कधीपर्यंत असं खेळणार. पण त्याने असं देखील म्हटलं की, भारतीय खेळाडूंनी अजून कोणत्याही सिमा नाही ओलांडल्या. ती एक पॉझिटिव्ह स्लेजिंग होती. जे खेळामध्ये सामान्य आहे. प्रत्येकाला वाटतं की आपली टीम जिंकावी. त्यासाठी हे केलं जातं.' बुमराहचा तो नो बॉल भारताला भारी पडला आणि झमानने त्या फायनल मॅचमध्ये १०६ बॉलमध्ये ११४ रन केले.