नवी दिल्ली : सायकल चालक महिलेनं कोचवर गंभीर आरोप केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप कोचवर लावले आहेत. या प्रकरणी तिने भारतीय याचिंग महासंघात तक्रार दाखल केली होती. मात्र त्याची दखल न घेतल्याने आता SAI कडे न्याय मिळवून देण्यासाठी धाव घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी आता क्रीडा विभाग आणि SAI ने दखल घेतली आहे. एका भारतीय महिला सायकलपटूने स्लोव्हेनियामधील एका शिबिरात राष्ट्रीय स्प्रिंट टीमच्या प्रशिक्षकावर गैरवर्तन केल्याचा आरोप लावला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रीडा प्राधिकरणाला पाठवलेल्या ईमेलनंतर ही तक्रार नोंदवण्यात आली. 


सायकलपटूने राष्ट्रीय प्रशिक्षकावर केलेला आरोप गंभीर आहे. दिलेल्या तक्रारीनुसार 29 मे रोजी स्लोव्हेनिया संघाच्या दौऱ्यात सायकलपटूला कोचने जबरदस्ती आपल्या खोलीत नेल्याचं सांगितलं. मानसिक छळ आणि गैरवर्तनाचा आरोप लावण्यात आला आहे. 


SAI ने एका निवेदनात म्हटले आहे की, या तक्रारीनंतर सायकलपटूला सुरक्षित वाटावे या हेतून पुन्हा भारतात आणण्यात आलं. यासोबत संपूर्ण भारतीय सायकलिंग टीमला परत बोलवण्यात आलं. 


SAI आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (CFI) यांनी आरोपांच्या चौकशीसाठी दोन स्वतंत्र चौकशी समित्या स्थापन केल्या. पीडित सायकलपटू 18 ते 22 जून दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी स्लोव्हेनियामध्ये असलेल्या भारतीय टीमसोबत सहभागी झाली होती.