मुंबई : मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अंकर आहे. ती क्रिकेट सामन्यांमध्ये प्री मॅच आणि पोस्ट मॅच शो होस्ट करते. ती भारतीय टीमचा ऑलराऊंडर क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. तिच्या जबरदस्त अंकरींगमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्या एका चाहत्याने तिला डिनर डेटबद्दल विचारले असता मयंतीने त्याला मजेशीर उत्तर दिले. ते ऐकून तिचे चाहतेही हैराण झाले.


चाहत्याने केला असा मेसेज...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फहाद खान नावाच्या एका चाहत्याने ट्विटरवर तिला विचारले की, जेव्हा कधी मी तुम्हाला पाहतो तेव्हा मी दंग होऊन जातो. तुम्ही क्लास आणि पर्सनालिटीचे उत्तम उदाहरण आहात. काश, मी तुम्हाला डिनर डेटला घेऊन जाण्यास लायक असतो. तुम्ही किती सुंदर आहात हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.



त्यावर मयंतीचे जबरदस्त उत्तर


यावर मयंतीने जबरदस्त उत्तर दिले. ती म्हणाली, धन्यवाद! मी आणि माझा पती तुझ्या डिनर डेटला येऊ इच्छितो. सध्या मयंती आयपीएलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने आतापर्यंत आयपीएलचे सर्व सीजन होस्ट केले आहेत आणि या सीजनमध्येही तिच्या अंकरींगचे जलवे पाहायला मिळतील.


स्टुअर्ट बिन्नीसोबत विवाह 


क्रिकेटशिवाय मयंतीने फीफा वर्ल्ड कप पासून कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत अनेक इव्हेंट्स आणि स्पोर्ट्स टूर्नामेंटचे होस्टिंग केले आहे. २०११ चा वर्ल्डकप देखील तिनेच होस्ट केला होता. मयंतीने लेंगरने सप्टेंबर २०१२ मध्ये स्टुअर्ट बिन्नीसोबत विवाह केला. स्टुअर्ट बिन्नी डोमॉस्टिक क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळतो.



ती बिन्नीचा बचाव करताना दिसते


अनेक खेळाडूंची मुलाखत घेणाऱ्या मयंतीला आपला पती स्टुअर्ट बिन्नीची मुलाखत घेण्याची संधीही मिळाली होती. कर्नाट प्रीमियर लीगमध्ये ही संधी मिळाली होती. स्टुअर्ट बिन्नीने आपली टीम बेळगावी पॅंथर्ससाठी ४६ चेंडूत ८७ धावा केल्या होत्या. ज्यात ८ चौकार आणि ५ छटकारांचाही समावेश होता. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. मात्र नेहमीच त्यांनी टीकेला जबरदस्त उत्तर दिले आहे. तर बरेचदा ती बिन्नीचा बचाव करताना दिसते.