मुंबई : आयपीएल जिंकण्याचं रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं यंदाचं स्वप्नही भंगलंय. आयपीएल 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा राजस्थानने पराभव केला. यावेळी बंगळूरूचा फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा फेल ठरलाय. अवघे 7 रन्सवर तो प्रसिद्ध कृष्णाचा बळी ठरला. तर या सामन्यात विराट कोहलीसोबत एक मोठी घटना घडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबी फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा खराब सुरक्षा पाहायला मिळाली. खेळपट्टीवर उपस्थित असलेल्या विराट कोहलीला भेटण्यासाठी एक तरुण फॅन मैदानावर आला होता. यावेळी त्याने कोहलीशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. 


Virat Kohli ला भेटण्यासाठी चाहता पोहोचला थेट मैदानात


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक फॅन विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात घुसला होता. सुरक्षारक्षकांची नजर चुकवून थेट विराटकडे धावला. अशा स्थितीत या चाहत्याला विराटशी हँड शेक करायचा होता. मात्र चाहत्याने हात पुढे केला असतानाही विराट हँडशेक केलं नाही. 



अशा परिस्थितीत तरुणाने थेट स्वत: विराट कोहलीचा हात पकडून त्याच्याशी हँडशेक करून घेतलं. दरम्यान चाहत्याने विराटशी हात मिळवेपर्यंत सुरक्षा कर्मचारीही मैदानात येऊन चाहत्याला मैदानाबाहेर घेऊन गेले.


आयपीएल 2022 च्या सिझनमध्ये तिसऱ्यांदा एका चाहत्याने सुरक्षारक्षकांची नजर चुकवून मैदानात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. यंदाच्या आयपीएलमध्ये बऱ्यापैकी सुरक्षितता पाहायला मिळाली. त्यामुळे आता खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात.