Dolly Chaiwala: भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०२१च्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या जबरदस्त कामगिरीने सगळ्यांचं दखल घ्यायला लावली. यानंतर मागील महिन्यातील पॅरिस  ऑलिम्पिक गेम्समध्येही उत्तम खेळ करून देशाची मान उंचावली. परंतु लोक आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावणाऱ्या या खेळाडूंना दुर्लक्ष करून सोशल मीडिया स्टार डॉली चायवाला सोबत सेल्फी घेण्यासाठी गेले. भारतीय हॉकी टीममधील हार्दिक सिंग या खेळाडूने एका यूट्यूब पॉडकास्टवर या घटनेची आठवण करून देताना म्हणाला की तो क्षण त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना लाजवेल असा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय घडलं?


हार्दिक सिंग पॉडकास्टवर बोलताना म्हणाला की, "मी विमानतळावर हे सर्व माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. हरमनप्रीत, मी आणि मनदीप असे आम्ही ५-६ जण होतो. डॉली चायवालाही तिथे होता. विमानतळावरील काही लोक त्याच्यासोबत फोटो काढत होते पण ते आम्हाला ओळखू शकत नव्हते. हे सगळं पाहून आम्ही एकमेकांकडे बघतच बसलो." 


लोकांच्या कौतुकापेक्षा मोठे काही नाही


हार्दिक म्हणाला की, " एका एथलीटसाठी प्रसिद्धी आणि पैसा ही एक गोष्ट असतेच. पण जेव्हा लोक तुम्हाला पाहतात आणि तुमचं कौतुक करतात, तेव्हा खेळाडूसाठी यापेक्षा मोठे समाधान असूच शकत नाही."


कोण आहे डॉली चायवाला? 
डॉली चायवाला हा नागपूरमधील चहा विक्रेता आहे. गेल्या १६ वर्षांपासून तो चहा विकत आहे. त्याच्या हटके चहा विकण्याच्या स्टाईलमुळे तो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. याशिवाय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी देखील त्याच्या चहाच्या टपरीवर जाऊन चहाचा आस्वाद घेतला. यामुळे डॉली चायवाला जास्तच चर्चेत आला. डॉली चायवालाचे खरे नाव सुनील पाटील असे आहे.