नवी दिल्ली : दंगल चित्रपटातील 'धाकड गर्ल'ने केलेली कामगिरी सिनेमाच्या भव्य पडद्यावर सर्वांनीच पाहिली. पण, वास्तवातही एका 'धाकड गर्ल'ची कहाणी अशीच प्रेरणादाई आहे. दिव्या काकरण असे या जिद्दी मुलीचे नाव.


प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, नियतीने लिहीलेला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेडल जिंकणे हे कोणत्याही स्पर्धेतील एक सर्वसामान्य बाब. कारण, कोणाला ना कोणाला ते मिळतच असते. पण, खरा सलमा असतो तो मेडल मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षाला. हा संघर्षसुद्धा प्रत्येकाच्या परिस्थितीनुरूप वेगवेगळा. नियतीने लिहून ठेवल्यासारखा. दिव्या काकरण हीच्याही भाळी असाच संघर्ष नियतीने लिहीला होता. नुकताच तिने कुस्ती चॅंम्पीयनशिपचा सीनियर लेवलचे गोल्ड मेडल. जिंकले. पण, तिचा हा विजय केवळ एकेरी नाही. त्यापाठीमागची कहाणीही तितकीच संघर्ष आणि प्रेरणादाई आहे.


काय आहे कहाणी?


मनात जिंकण्याची जिद्द. पण, परिस्थितीत बेताची. त्यामुळे घरात आर्थिक विवंचना कायमच्याच. त्या सोडविण्यासाठी वडीलांनी सुरू केला व्यवसाय. हा व्यवसायही काय तर, कुस्तीचे सामने भरतील तिथे फिरायचे आणि मैदानाबाहेर लंगोट विकायचे. दिव्याचे वडील सूरज काकरण यांनाही कुस्तिचा भारी नाद. पैलवान म्हणून नाव कमवायचे कधी काळी स्वप्नही पाहिलेले. जे परस्थितीमुळे अर्धवटच राहिले. पण, मुलीला कुस्तीपटू बनवायचे हे त्यांच्या मनात नक्की होते. त्यामुळे कुस्तीचे मैदान गाजवणाऱ्या दिव्याचा सामना ज्या ज्या मैदानावर असायचा तिथे सुरज तिच्यासोबत असायचे. दिव्या मैदानावर कुस्ती खेळायची. तर, सूरज मैदानाबाहेर लंगोट विकायचे. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालायचा.


प्रचंड मेहनतीने दिव्या बनली रेसलर


दरम्यान, दिव्याच्या संघर्षाला यशाची फळे लागली. अनेक मैदानावर तिने मेडल जिंकली आहेत. पण, कुस्ती चॅंम्पीयनशिपचा सीनियर लेवलचे गोल्ड मेडल जिंकल्यावर तिला एक उत्कृष्ट महिला युवा रेसलर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.


परिस्थिती 'जैसे थे'


दरम्यान, मेडल जिंकून परतल्यावर दिव्या रहात असलेल्या परिसरातील नागरिकांनी तिचे प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केले. पण, आजही तिच्या घरची परिस्थीती सारखीच आहे. पूर्व दिल्लीतील गोकुळपूरी परिसरात दोन खोल्यांच्या घरात ती आपल्या परिवारासोबत राहते. कुटूंबाच्या संघर्षाबद्दल बोलताना दिव्याचे वडील सूजर काकरण सांगतात, 'घरची परिस्थीती बेताची आहे. दिव्याला जी पदकं, बक्षिसं मिळतात त्यातूनच घरचा डोलारा सांभाळला जातो. लंगोट विकून मला काही पैसे मिळतात. त्यूनही कुटूंबाला हातभार लागतो.'