भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी FIFA ने भारताची फुटबॉल संघटना AIFF वर बंदी घातली होती. पण आता फिफाने ही बंदी हटवली आहे. यासह भारताला पुन्हा एकदा अंडर-17 महिला फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FIFA ने AIFF वरील बंदी हटवून सर्व भारतीयांना एक मोठी बातमी दिली आहे. FIFA ने एका निवेदनात म्हटले आहे की, "परिषदेने 25 ऑगस्ट रोजी एआयएफएफचे निलंबन त्वरित उठवण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे 11-30 ऑक्टोबर 2022 रोजी होणारा फिफा अंडर-17 महिला विश्वचषक 2022 नियोजित प्रमाणे भारतात आयोजित केला जाऊ शकणार आहे."


फुटबॉलची मुख्य सत्ताधारी संस्था फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) बंदी घातल्याने मोठा धक्का बसला होता. तिऱ्हाईताच्या हस्तक्षेपामुळे ‘फिफा’च्या नियमावलीचे गांभीर्याने उल्लघंन झाल्याचा ठपका ठेवत फिफाने ही बंदी घातली होती.


एआयएफएफवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. या निलंबनामुळे भारत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही आणि कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही. मात्र आता पुन्हा एकदा सर्व मार्ग खुले झाले आहेत.