Fifa Winner: `मेस्सीचा जन्म भारतात झाला असता तर...`; विरेंद्र सेहवागची आगळी वेगळी भविष्यवाणी!
फिफा वर्ल्डकपच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाच्या टीमने फ्रान्सचा (Argentina vs France) पराभव केला. या सामन्यानंतर जगभरात सगळीकडे मेस्सीच्याच नावाची चर्चा सुरु आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Viredra sehwag) याने देखील मेस्सीबाबत एक सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली आहे.
Fifa World Cup Final Winner: काल रात्री स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न अखेर पूर्ण झालं. फिफा वर्ल्डकपच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात अर्जेंटीनाच्या टीमने फ्रान्सचा (Argentina vs France) पराभव केला. या सामन्यानंतर जगभरात सगळीकडे मेस्सीच्याच नावाची चर्चा सुरु आहे. यावेळी टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग (Viredra sehwag) याने देखील मेस्सीबाबत एक सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केली आहे. ही पोस्ट पाहून नक्कीच तुम्हीचं हसू आवरणार नाही.
विरेंद्र सेहवागने अर्थात त्याच्या शैलीमध्ये ही पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने लिओनेस मेस्सी जर भारतात असता, तर काय झालं असतं, याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
मेस्सीचा जन्म जर भारतात झाला असता तर...
सोशल मीडियावर विरेंद्र सेहवागने मेस्सीचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये मेस्सी पोलिसांच्या वेशात दिसतोय. या फोटोला कॅप्शन देताना सेहवागने म्हटलं की, जर मेस्सीचा जन्म भारतात झाला असता, तर फायनल जिंकल्यानंतर काय झालं असतं. यानंतर लोकांनी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. मुळात काही लोकांना हे मीम समजलंच नाहीये.
दिग्गजांना मानद पद देण्यात येतं
भारतात जेव्हा प्रसिद्ध खेळाडूंना सर्व प्रमुख विभागांमध्ये एक मानद दर्जा देण्यात येतो. महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला भारतीय वायुसेनेने ग्रुप कॅप्टनची रँक देण्यात आलाय. तर महेंद्रसिंग धोनीला भारतीय सैन्याकडून लेफ्टनंट कर्नलचा रँक मिळालाय. याशिवाय हरभजन सिंगला पंजाब पोलिसात डीएसपीची पदवी आहे. इतकंच नाही तर विराट कोहली बीएसएफचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आलंय.
मेस्सीला पोलीस का बनवलं असतं?
भारतातील अनेक खेळाडूंना अशा मानद पदव्या देण्यात आल्या आहेत. यामुळे वीरेंद्र सेहवागने ही पोस्ट शेअर केलीये. यामध्ये लिओनेल मेस्सीला पोलीस अधिकारी दाखवण्यात आलंय. मुळात हा फोटो मेस्सीचा नसून तसा तयार करण्यात आलाय. यूजर्सना देखील सेहवागची ही पोस्ट फार आवडलीये.
फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटीनाचा विजय
सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेंटीनाने थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला. अर्जेंटिनासाठी मेस्सी (Lionel Messi) आणि डी मारियाने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत विजयी आघाडी घेतली. तर अखेरीस अर्जेंटिनाने 4-2 (Argentina vs France) असा विजय साकारत तिस-यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.