FIFA WC: 2010 वर्ल्ड कपमध्ये पॉल ऑक्टोपस, आता 2022 मध्ये पाहा कोण करतंय भविष्यवाणी, वाचा
FIFA World Cup 2010 मध्ये पॉल ऑक्टोपसने केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या होत्या, आताच्या फूटबॉल वर्ल्ड कपमध्येही अशीच भविष्यवाणी होतेय, पण कोण करतंय... वाचा
FIFA WC 2022 : कतारमध्ये (Qatar) सुरु असलेला फुटबॉल वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. आता क्वार्टर फायनलच्या (Quarter Final) सामन्यांची रंगत सुरु असून फायनलमध्ये (Final) कोणते दोन संघ धडक मारणार याची उत्सुकता जगभरातील फूटबॉल चाहत्यांना लागली आहे. अशात पुन्हा एकदा पॉल ऑक्टोपसची (Paul Octopus) आठवण काढली जात आहे. 2010 वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पॉल ऑक्टोपस एखाद्या स्टार खेळाडूपेक्षाही जास्त चर्चेत होता. याचं कारण म्हणजे त्याने वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरत होतं.
पॉल ऑक्टोपसची भविष्यवाणी
2010 फूटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत (FIFA World Cup) पॉल ऑक्टोपसने काही सामन्यात भविष्यवाणी वर्तवली होती, आणि ती खरी ठरली होती. पॉल ऑक्टोपसला पाण्याच्या एका टँकमध्ये ठेवलं जात होतं. त्याच्या समोर 2 बॉक्स ठेवले जात होते, त्यावर वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या दोन संघांचे झेंडे चिकटवले जायचे. पॉल ऑक्टोपस ज्या बॉक्सला स्पर्श करायचा तो संघ जिंकायचा. पॉल ऑक्टोपसची जवळपास सर्वच भविष्यवाणी खरी ठरली होती. पॉलने 2008 मध्ये यूरो फूटबॉल (Euro Football) स्पर्धेतही भविष्यवाणी वर्तवली होता
फिफा 2022 मध्ये कोण करतंय भविष्यवाणी?
पॉल ऑक्टोपसचा मृत्यू झालाय, त्यामुळे आता कतारमध्ये सुरु असलेल्या फूटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत कोणता प्राणी भविष्यवाणी करतोय याची उत्सुकता चाहत्यांना आहे. तर यंदाच्या स्पर्धेतही असे काही प्राणी आहेत ज्यांची भविष्यवाणी खरी ठरतेय. जपानमध्ये केंट नावाच्या एका माकडाने (Baboons) क्रोएशियाचा संघ राऊंड-16 मध्ये जपानवर मात करेल असं भाकित वर्तवलं होतं, आणि खरंच झालं ही तसंच. क्रोएशिया आणि जपानदरम्यानचा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानला 3-1 असं पराभूत केलं.
जपानमध्येच टाइयो नावाचा एक शहामृग (Ostriche) आहे. जपान आणि जर्मनीदरम्यानच्या सामन्यादरम्यान या शहामृगासमोर दोन बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्याने जपानचा झेंडा असलेल्या बॉक्सला स्पर्श केला होता. जपानने ग्रुप सामन्यात जर्नमीचा 2-1 ने पराभव केला होता. वर्ल्ड कप स्पर्धेतील हा मोठा उलटफेर होता.
हे ही वाचा : राज्यपालांच्या खुर्चीसोबत अभिनेत्रीने काढले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद
2018 मध्ये मांजर होती चर्चेत
फिफा 2018 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर 2018 मध्ये रशियातल्या एका मांजरीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. या मांजरीचं नाव आचिल्लीस असं होतं. या मांजरीने वर्तवल्या काही भविष्याणी खऱ्या ठरल्या तर काही खोट्या ठरल्या होत्या. 2018 मध्ये रशिया फूटबॉल वर्ल्ड कप जिंकेल असं आचिल्लीसने भाकित वर्तवलं होतं. पण असं झालं नव्हतं.