FIFA World Cup 2022: Lionel Messi ला गंभीर दुखापत; अंतिम सामन्यापूर्वी अर्जेंटिनाला मोठा धक्का
Argentina vs France FIFA WC Final : फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलढ्य संघांमध्ये यंदाचा फिफा वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला जाणार आहे. 18 डिसेंबरला पार पडणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत.
Lionel Messi Injured Before Argentina vs France Final : 2022 फिफा वर्ल्ड कप फायनलला (FIFA World Cup 2022 Final ) आता अवघे काही तास उरलेले असतानाच फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही संघांमधील खेळाडू आणि त्यांचा अद्वितीय खेळ पाहता नेमकं जेतेपद कुणाला मिळणार याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली. आपल्या देशाला जगज्जेतेपद मिळवून देण्याचा प्रत्येक संघातील खेळाडूंचा प्रयत्नही आहे. किंबहुना त्यासाठीच ही मंडळी प्रयत्नशील आहेत. पण, या अंतिम सामन्याआधी अर्जेंटिनापुढे काही अडचणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण संघाचा कर्णधार आणि आघाडीचा खेळाडू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi ) दुखापतग्रस्त झाल्याचं कळत आहे.
मेस्सीला नेमकं काय झालंय?
क्रोएशियाविरोधातील सामन्यातच मेस्सी (lionel messi) हॅमस्ट्रिंगमुळं काहीसा अचणीत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच गुरुवारी संपूर्ण संघ सराव करत असताना मेस्सी मात्र त्यात कुठेच दिसला नाही. त्यामुळं तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं त्रस्त असल्याचं उघड झालं. आता तो अंतिम सामना खेळणार की नाही? हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे.
हेसुद्धा वाचा : FIFA WC 2022 Final: अर्जेंटिना आणि फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
दरम्यान, एकिकडे मेस्सीचे चाहते आणि सर्वच फुटबॉलप्रेमी चिंतेत असताना तज्ज्ञांच्या मते मेस्सी अंतिम सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळं चाहत्यांनी चिंता करू नये. आता सामन्याच्या दिवशी मेस्सी मैदानात उतरतोय की नाही याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
रविवारी होणार महामुकाबला
कतारनं यजमानी करत यावेळच्या फिफा वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं. काही वाद, काही मतमतांतरं, देशोदेशीची आंदोलनं अगदी जागतिक स्तरावरील प्रश्नांना वाचा फोडत ही स्पर्धा बहुविध कारणांनी चर्चेत ठरली. पाहचा पाहता आता ही स्पर्धा सांगतेच्या टप्प्यावर आली आहे. रविवारी म्हणजे 18 डिसेंबरला अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina vs France) हे दोन भक्कम संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यामध्ये फ्रान्सचा आक्रमक खेळ वरचढ ठरणार की पुन्हा एकदा मेस्सी नावाचा जादूगार संघाच्या मदतीनं जगज्जेतेपद मिळवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. संपूर्ण क्रीडाजगतातून या सामन्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तुम्ही तयार आहात का या महामुकाबल्यासाठी?