FIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?
FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत.
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये (Qatar) रंगत असलेल्या फुलबॉलच्या महाकुंभमेळात (FIFA World Cup 2022) आतापर्यंत गतविजेता फ्रान्स (France), पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील (Brazil) आणि अनुभवी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) संघ पोर्तुगाल (Portugal) हे पुढच्या फेरीत पोहोचले आहेत. तर, यजमान कतार बाहेर पडला आहे. आतापर्यंत आपण फुटबॉलचे सामने वेगवेगळ्या वेळी पाहिले मात्र आता एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत. त्यामुळे फुलबॉलप्रेमी जरा नाराज आहेत. कारण एकाच वेळी सामने असल्याने कुठली मॅच बघायची असा प्रश्न त्यांचा समोर आहे. हे करण्यामागे मोठं कारण आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल या मागे नेमकं काय कारण आहे.
फॉरमॅट बदलण्यामागे काय कारण? (Why did the format change?)
यामागचं कारण समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्पेनमध्ये 1982 मध्ये झालेल्या वर्ल्डकप आठवावा लागेल. 25 जून 1982 मध्ये जेव्हा स्पेनमधील गिजॉनमधील एल मोलिनॉन स्टेडियमवर पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया यामध्ये रंगलेला सामना आठवतो का? या सामन्याला 'द ह्युमिलेशन ऑफ गिजॉन'(Disgrace of Gijon.) म्हणून ज्याची आज ओळख आहे. 1982 मध्ये फिफा विश्वचषक स्पर्धेत युरोपियन संघाचा पराभव करणारा अल्जेरिया हा पहिला आफ्रिकन राष्ट्र ठरला. पश्चिम जर्मनीला 2-1 ने पराभूत केल्यानंतर, अल्जेरियाला ऑस्ट्रियाकडून (0-2) पराभव पत्करावा लागला आणि चिलीवर 3-2 असा रोमांचक विजय नोंदवला. (fifa world cup 2022 group stage match timings why same time together)
जर्मनी-ऑस्ट्रियावर फिक्सिंगचे आरोप
त्यानंतर अल्जेरियाचा संघ त्यांचा अंतिम गट सामना पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रियासमोर खेळणार होता. त्या वेळी जर्मनीने एक किंवा दोन गोलने विजय मिळवला तर जर्मनी आणि ऑस्ट्रियाला पात्रतेची हमी होती. जर जर्मनीने 4-0 किंवा 5-0 असा मोठा विजय नोंदवला असता, तर माजी चॅम्पियनने अल्जेरियाचा पुढील फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला असता. पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रिया या दोघांनाही माहीत होते की जर्मनीचा 1-0 किंवा 2-0 असा विजय मिळवल्यास दोन्ही संघांची गट टप्प्यातील प्रगती निश्चित झाली असती.
या सामन्यात जर्मन संघाला पहिल्या 10 मिनिटांत केवळ एक गोल करता आला. जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा सामन्याचा वेग हळूहळू खालावत गेला आणि कोणत्याही संघाकडून खेळण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नव्हता आणि पश्चिम जर्मनीने 1-0 असा विजय मिळवला.
'गिजोनची बदनामी' काय झाली?
पश्चिम जर्मनी आणि ऑस्ट्रियावर निकाल निश्चित केल्याचा आरोप होता. मात्र फिफाने असा निर्णय दिला की कोणत्याही संघाने कोणताही नियम मोडला नाही.
या घटनेनंतर, FIFA ने भविष्यातील स्पर्धांसाठी नियम बदला, जिथे प्रत्येक गटातील अंतिम दोन गेम एकाच वेळी खेळले जातील जेणेकरून पुन्हा कधी अशी घटना घडणार नाही. त्यानंतर फिफा वर्ल्डकपमध्ये हा नियम सुरु झाला. यामुळे कोणत्याही संघाला चुकीचा फायदा घेण्याची संधी मिळणार नाही.