FIFA WC 2022: `यंदाचा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार`, `या` संघांच्या प्रशिक्षकांनं सांगितली रणनिती
FIFA World Cup: उपांत्यपूर्व फेरीत (FIFA Quarter Final) 32 पैकी आठ संघांनी मारली आहे. यामध्ये क्रोएशिया (Croatia), ब्राझील (Brazil), नेदरलँड (Netherland), अर्जेंटिना (Argentina), मोरोक्को (Morocco), पोर्तुगाल (Portugal), इंग्लंड (England) आणि फ्रान्स (France) हे संघ आहेत. यापैकी कोणता संघ जेतेपदावर नाव कोरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
FIFA World Cup 2022 Morocco Vs Portugal: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. जेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघापुढे तीन सामने जिंकण्याचं आव्हान आहे. उपांत्यपूर्व फेरीत (FIFA Quarter Final) 32 पैकी आठ संघांनी मारली आहे. यामध्ये क्रोएशिया (Croatia), ब्राझील (Brazil), नेदरलँड (Netherland), अर्जेंटिना (Argentina), मोरोक्को (Morocco), पोर्तुगाल (Portugal), इंग्लंड (England) आणि फ्रान्स (France) हे संघ आहेत. यापैकी कोणता संघ जेतेपदावर नाव कोरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मोरोक्को सुपर 16 फेरीत स्पेनला पराभूत केल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे मोरोक्को या आफ्रिकन संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. इतकंच काय तर संघाचे प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांनी वर्ल्डकप जिंकणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. स्पेनला पराभूत केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे.
"आम्ही वर्ल्डकप का जिंकू शकत नाही. लक्ष्य कठीण असलं तरी आमचा निर्धार पक्का आहे." असं प्रशिक्षक वालिद रेग्रागुई यांनी सांगितलं. मोरोक्को संघ पुढील 3 सामन्याच्या 270 मिनिटांवर लक्ष केंद्रीत करून आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. मोरोक्कोचा पुढचा सामना तगड्या अशा पोर्तुगाल संघाशी आहे. त्यामुळे पोर्तुगालचं पारडं जरी असलं तरी मोरोक्कोचा आत्मविश्वासही तितकाच दुणावलेला आहे.
बातमी वाचा- FIFA World Cup 2022 : ''...हे खुप लाजिरवाण आहे', रोनाल्डोची गर्लफ्रेंड प्रशिक्षकावर भडकली
भारतीय वेळेनुसार 10 डिसेंबरला संध्याकाली 8.30 वाजता हा सामना असणार आहे. मेस्सीप्रमाणे पोर्तुगालच्या रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे भावना जुळलेल्या आहेत. पोर्तुगालने साखळी फेरीत घाना, उरुग्वे, साउथ कोरिया यांना पराभूत केलं. तर सुपर 16 मध्ये स्वित्झर्लंडचा 6-1ने धुव्वा उडवला. दुसरीकडे मोरोक्कोने साखळी फेरीत तगड्या बेल्जियमचा 2-0 ने पराभव करत आपली छाप पाडली आहे. त्यानंतर कॅनडाचा 2-1 पराभव केला. तर क्रोएशिया विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. सुपर 16 फेरीत स्पेनविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा 3-0 ने पराभव केला.