FIFA World Cup 2022 Argentina vs Croatia : क्रोएशियाच्या (Croatia) संघावर मात केल्यानंतर अर्जेंटिनानं 3-0 अशी आघाडी घेत थेट 2022 च्या फिफा वर्ल्ड (Fifa World Cup 2022) कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. जुलिअन अलवारेझ आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्या दमदार खेळामुले आणि संघाच्या अप्रतिम कामगिरीमुळे हे शक्य होऊ शकलं. अंतिम सामन्यात पोहोचण्याचं मेस्सीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतानाच आता वर्ल्ड कप जिंकण्यालाच हा फुटबॉलचा (Football) जादूगार प्राधान्य देताना दिसणार आहे. मेस्सीच्या फुटबॉल कारकिर्दीतील या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी क्रीडारसिकांना मिळाली. त्यासोबतच या खेळाडूच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असणारी पत्नी, अँटोनेलासुद्धा (Antonela) यावेळी कतारमधील मैदानात उपस्थित होती. मुलं आणि पत्नीनं यावेळी मेस्सीचा खेळ पाहून नेहमीप्रमाणे एकच जल्लोष केला. (FIFA World Cup 2022 watch video captain Lionel Messis wife Antonela celebrates argentina went to finals )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेस्सीचं मुलं आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल होत आहेत. यामध्ये पतीनं आणि अर्जेंटिनाच्या संघानं मिळवलेला विजय पाहता अँटोनेलाला अत्यानंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. मेस्सीच्या विजयानंतरची ही तिची पहिली प्रतिक्रिया सध्या सर्वांचीच मनं जिंकून जात आहे. दरम्यान आता अर्जेंटिनासमोर (Argentina) फ्रान्सची वर्णी लागते की, मोरोक्कोचा संघ अंतिम सामन्यात धडकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण, तो क्षणही मेस्सीसोबतच त्याच्या कुटुंबासाठीसुद्धा तितकाच खास असेल. 


बालपणीची मैत्रीण ते आयुष्यभराची जोडीदार... 


Antonella Roccuzzo ही मेस्सीची बालमैत्रीण. वयाच्या पाचव्या वर्षांपासून ते दोघंही एकमेकांना ओळखतात. अँटोनेला मेस्सीच्याच एका मित्राची बहीण. 2007 च्या सुमारास मेस्सी त्याचं फुटबॉल खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बार्सिलोनाला गेला, पण एका खास व्यक्तीच्या निधनामुळे खचलेल्या अँटोनेलाला आधार देण्यासाठी तो Rosario या शहरात परतला होता. पुढे मेस्सी आणि तिचं नातं आणखी घट्ट झालं. इतकं की बार्सिलोनामध्ये असणाऱ्या मेस्सीसोबत राहण्यासाठी तिनं शिक्षणंही अर्ध्यावरच सोडलं.



हेसुद्धा वाचा : FIFA World Cup 2022 : स्वप्नपूर्ती! मेस्सी नावाच्या जादुगारामुळं अर्जेंटिनाची अंतिम सामन्यात धडक 






2016 मध्ये Ricky Sarkany या डिझायनरसाठी तिनं मॉडेलिंग सुरु केलं आणि पुढच्याच काळात बार्सिलोनाच्या Luis Suarez या खेळाडूच्या पत्नीसोबत स्वत:चं बुटीक सुरु केलं. 2017 मध्ये मेस्सी आणि तिनं अखेर त्यांच्या या नात्याला लग्नाचं नाव देत सहजीवनाची नवी सुरुवात केली. हे अर्जेंटिनामधील बहुप्रतिक्षित लग्न ठरलं होतं. 




सोशल मीडियावर अँटोनेलाचे 22 मिलियन फॉलोअर्स 


मेस्सीची पत्नी असण्यासोबतच अँटोनेलाची स्वत:चीही ओळख आहे. ती कायमच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. या प्लॅटफॉर्मवर तिचे 22 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. मेस्सी आणि अँटोनेलाला Thiago, Matteo आणि Ciro अशी तीन मुलं आहेत. मेस्सीचं हे सुरेख कुटुंब त्याच्या प्रत्येक यशापयशात त्याला साथ देत असतं.