FIFA World Cup Golden Boot : आजच्या रविवार 20 नोव्हेंबर 2022 हा क्रिडाप्रेमींसाठी खास आहे. कारण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील (IND vs NZ 2nd T20) T20 मालिकेतील दुसरा सामना आज  माउंट मौनगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. तर फिफा वर्ल्ड कप 2022 ला (Fifa World Cup) आजपासून कतारमध्ये रंगणार आहे.  1982 पासून गोल्डन शू प्रत्येक वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. मात्र 2010 पासून याचं नाव बदलून 'गोल्डन बूट'(Golden Boot)असं करण्यात आलं. त्यामुळे यंदा कोणाला हा मान मिळणार यावर चर्चा सुरु झाली आहे. 92 वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत हा मान कोणाकोणाला मिळाला आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला त्यांच्या नावावर एक नजर टाकूयात...(FIFA World Cup Golden Boot award winners list nmp)


या खेळांडूंना मिळाला 'गोल्डन बूट' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1. वर्ल्डकप 2018 : इंग्लंडचा हॅरी केन (6)
2. वर्ल्डकप 2014 : कोलंबियाचा जेम्स रॉड्रिग्ज (6)
3.वर्ल्डकप 2010 : जर्मनीचा थॉमस मुलर (5)
4. वर्ल्डकप 2006 : जर्मनीचा मिरोस्लाव क्लोज (5)
5. वर्ल्डकप 2002 : ब्राझीलचा रोनाल्डो (8)
6. वर्ल्डकप 1998 : क्रोएशियाचा डॅवर सेकर (6)
7. वर्ल्डकप 1994 : रशियाचा ओलेग सालेन्को आणि बल्गेरियाचा ह्रिस्टो स्टोइचकोव्ह (6)
8. वर्ल्डकप 1990 : इटलीचा साल्वाटोर चियाल्ची (6)
9. वर्ल्डकप  1986 : इंग्लंडचा गॅरी लिनकर (6).
10. वर्ल्डकप 1982 : इटलीचा पाउलो रॉसी (6)
11. वर्ल्डकप 1978 : अर्जेंटिनाचा मारियो केम्पेस (6)




12. वर्ल्डकप 1974 : पोलंडचा ग्रेगॉर्झ (7)
13. वर्ल्डकप 1970 : जर्मनीचा गर्ड मुलर (10)
14. वर्ल्डकप 1966 : पोर्तुगालचा युसेबिओ (9)
15. वर्ल्डकप 1962 : फ्लोरियन अल्बर्ट, व्हॅलेंटीन इव्हानोव, गॅरिंचा, वावा, ड्राजन जार्कोविच, लिओनेल सांचेझ (4)
16.  वर्ल्डकप 1958 : फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन (13)
17. वर्ल्डकप 1954 : हंगेरीचा सँडोर कोचिस (11)
18. वर्ल्डकप 1950 : ब्राझीलचा एडमिर (8)
19. वर्ल्डकप 1938 : ब्राझीलचा लिओनिडास (7)
20. वर्ल्डकप 1934 : झेकोस्लोव्हाकियाचा अल्ड्रिच नेज्डली (5).
21. वर्ल्डकप 1930 : अर्जेंटिनाचा गुलेर्मो स्टेबिले (8)