Mohammed Shami - Sania Mirza : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा होती. खरंतर माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी हे लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. खरंचर सानियाच्या वडिलांनी एका मुलाखतीत या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते. शमी हा टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या भारतीय टीमचा देखील भाग नाही आहे. तरी देखील त्याच्या खासगी आयुष्याविषयी सुरु असलेल्या म्हणजेच लग्नाच्या अफवांमुळे तो चर्चेत आला होता. मोहम्मद शमी आमि सानिया मिर्झाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण या सगळ्यात शमीनं एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी म्हणजेच 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमी हा मैदानात दिसलाच नाही. तर वनडे वर्ल्डकपमधील परफॉर्ममन्सनं मोहम्मद शमीनं सगळ्यांची मने जिंकली होती. मोहम्मद शमीच्या दमदार बॉलिंगनं भारतीय टीमला फायनलपर्यंत पोहोचवलं होतं. मोहम्मद शमीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडीओचं आणि सानिया मिर्झाचं काहीही कनेक्शन नाही. तर मोहम्मद शमीनं शेअर केलेला हा व्हिडीओ बंगळुरुमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीतील आहे. तिथे नेट्समध्ये तो गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.  तर ही पोस्ट शेअर करत शमी म्हणाला, 'सतत केलेले प्रयत्न हे नक्कीच आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जातात.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, मोहम्मद शमीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'आम्ही तुझी प्रतीक्षा करत आहोत.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'T20 वर्ल्ड कपमध्ये तुझी खूप आठवण आली.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'चॅम्पियन परतला.' 


हेही वाचा : ती निघून बराच वेळ झाला तरी ड्रेस काही संपेना! गायिकेचा 500 फूट लांब ड्रेस पाहिला का?


मोहम्मद शमीनं त्याचा फिटनेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत मोहम्मद शमी स्वत: वर खूप मेहनत करत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय मोहम्मद शमीनं भारतीय टीमच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. भारतीय टीम ज्या प्रकारे तिच्या सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यानं मोहम्मद शमी खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. शमीनं टीम इंडियाला जिंकल्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबत लिहिलं की विजयी होणं चांगलं आहे पण त्यापेक्षा बदला त्यापेक्षा चांगला आहे.