ती निघून बराच वेळ झाला तरी ड्रेस काही संपेना! गायिकेचा 500 फूट लांब ड्रेस पाहिला का?

Singer 500-foot Long Dress :  या गायिकेनं फॅशन वीकमध्ये परिधान केला तब्बल 500 फूट लांब ड्रेस... 

दिक्षा पाटील | Updated: Jun 26, 2024, 12:15 PM IST
ती निघून बराच वेळ झाला तरी ड्रेस काही संपेना! गायिकेचा 500 फूट लांब ड्रेस पाहिला का?  title=
(Photo Credit : Social Media)

Katy Perry  500-foot Long Dress : लोकप्रिय गायिका कॅटी पेरीचं नाव घेतलं की फॅशन आणि मस्ती हे चित्र आपल्या समोर येतं. कॅटी पेरीनं पॉप सिंगर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आता कॅटी पेरी ही तिच्या फॅशनसाठी देखील ओळखली जाते. ती अनेकदा असं काही करते की नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यावेळी देखील कॅटी पेरीनं तिच्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. काल म्हणजेच मंगळवारी फॅशन वीकसाठी Paris' Vendôme मध्ये हजेरी लावली होती. तेव्हाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सगळ्यांचे लक्ष त्यानं वेधले आहे. 

सोशल मीडियावर कॅटी पेरीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत कॅटी ही गाडीतून उतरताना दिसते. यावेळी तिनं बॅलेनियागाचा लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सुरुवातीला वाटलं की तिनं वन शोल्डर मिनी ड्रेस परिधान केला आहे. मात्र, ती जेव्हा हॉटेलच्या पायऱ्या चढत होती, त्यावेळी तिचा हा ड्रेस संपतच नव्हता. हा ड्रेस खूप मोठा आहे. तर 500 फूट लांब आहे, असं तिच्या फॅन पेजवर सांगण्यात येत आहे. तर तिच्या या 500 फूट लांब असलेल्या या ड्रेसच्या टेलवर कॅटी पेरीच्या woman’s world गाण्याचे लिरिक्स आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
“She’s a winner, champion/ Superhuman, number one/ She’s a sister, she’s mother. Open your eyes, just look around and you’ll discover/ You know/ It’s a woman’s world and you’re lucky to be living in it."

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे पाहायला मिळत आहे की तिच्या स्टाफ मधील लोक हे सतत तो ड्रेस खेचताना दिसत आहेत. दरम्यान, कॅटी पेरी ही गाण्यांमध्ये कमबॅक करणार आहे.  woman’s world हा तिचा सहावा स्टुडियो अल्बम आहे. तर 2020 मध्ये रिलीझ झालेल्या स्माईल या तिच्या अल्हबनंतर तिचा रिलीझ झालेला पहिला अल्बम असेल. 

हेही वाचा : वाढदिवसाच्या निमित्तानं सई ताम्हणकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

कॅटी पैरीविषयी बोलायचं झालं तर ती काही दिवसांपूर्वी झालेल्या अंनत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिसली होती. तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.