मुंबई विरुद्ध पराभवानंतर स्मिथला आणखी एक झटका, 12 लाखांचा दंड
राजस्थान रॉयल्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अबुधाबी : राजस्थान रॉयल्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 57 रनने हा सामना जिंकला. पराभवानंतरही राजस्थान संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला आणखी एक झटका लागला. स्लो ओव्हर रेटसाठी त्याला 12 लाखांचा दंड बसला.
राजस्थान संघ निश्चित वेळेत 20 ओव्हर पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे स्टीव्ह स्मिथला 12 लाखांचा दंड बसला. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'या हंगामात राजस्थान फ्रेंचायझीची ही पहिली चूक आहे. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार किमान ओव्हर रेट दंड आकारला जाईल.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सामन्यानंतर स्मिथ म्हणाला की, 'आम्ही सुरुवातीला विकेट गमावले. आम्हाला शेवटच्या 3 सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळाली नाही. सुरुवातीला बटलर व शेवटी जोफ्रा आर्चर व्यतिरिक्त आमच्याकडे अजून बरेच जणांना चांगलं कामगिरी करावी लागेल.'
बेन स्टोक्सबद्दल स्मिथ म्हणाला की, '10 ऑक्टोबरपर्यंत तो खेळू शकणार नाहीये. तो येण्यापूर्वी आम्ही आशा करतो की, आम्ही काही सामने जिंकू आणि फॉर्म मिळवू. मला वाटत नाही की आम्हाला घाबरून जाण्याची गरज आहे. रणनीती राबवण्याची ही बाब आहे.