वर्ल्ड कप तोंडावर असताना BCCI चं पितळ उघडं, देशातील `या` मोठ्या स्टेडियमला आग!
Eden Gardens Fire: कोलकाता ईडन गार्डनमध्ये नूतनीकरणाच्या कामात लागलेल्या आगीत संपूर्ण ड्रेसिंग रूम जळून खाक झाली आहे.
Fire breaks out at kolkata Eden Gardens: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक (World cup 2023) सुरू होण्यास अवघे दोन महिने शिल्लक आहेत. बीसीसीआय (BCCI) ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याच्या तयारीत असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्ल्ड कपआधी एक मोठं विघ्न समोर आलं आहे. आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या मैदानांमधील एका स्टेडियममध्ये असलेल्या ईडन गार्डन स्टेडियमला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय वर्ल्ड कप खेळवणार तरी कसा? असा सवाल विचारला जात आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कप नियोजनाबाबत बीसीसीआयचं पितळ उघडं पडल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय झालं?
कोलकातामधील जगप्रसिद्ध अशा ईडन गार्डन या स्टेडियममध्ये बुधवारी दुपारी आग लागली होती. दुपारी 11. 50 च्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. स्टेडियमला लागलेल्या या आगीमध्ये संपूर्ण ड्रेसिंग रूम जळून खाक झाल्याचं समजतंय. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागातील जवानांना घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. तासाभराच्या मेहनतीबद्दल आग विझवण्यात यश आलंय. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला गेला.
वर्ल्ड कप तोंडावर असताना अशी घटना घडली तरी कशी? असा सवाल आता विचारला जात आहे. ड्रेसिंग रूमच्या फॉल्स सिलिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे सचिव देबब्रत दास यांनी सांगितलं आहे.
ईडन गार्डन्सवर कोणते सामने?
ईडन गार्डन्सवर 2023 विश्वचषकाचे पाच सामने होणार आहेत.
Netherlands vs Bangladesh (October 28)
Pakistan vs Bangladesh (October 31)
India vs South Africa (November 5)
Pakistan vs England (November 11)
Second semi-final (November 16)