ऐतिहासिक डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दणक्यात सुरुवात
ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दणक्यात सुरुवात झाली आहे.
कोलकाता : ऐतिहासिक अशा डे-नाईट टेस्टमध्ये भारताची दणक्यात सुरुवात झाली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली आहे. पहिल्या दिवसाचा लंच झाला तेव्हा बांगलादेशचा स्कोअर ७३/६ असा झाला आहे. उमेश यादवने ३ तर इशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली आहे.
बांगलादेशचा ओपनर शदमन इस्लामने सर्वाधिक २९ रनची खेळी केली, तर लिटन दास नाबाद २४ रनवर खेळत आहे. बांगलादेशच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला खातंही उघडता आलं नाही. कर्णधार मोमीन उल हक, मोहम्मद मिथून आणि मुशफिकुर रहीम शून्य रनवर आऊट झाले.
भारत हा पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट मॅच खेळत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये हा सामना सुरु आहे. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे नेहमीच्या लाल बॉलऐवजी गुलाबी बॉलने ही मॅच खेळवली जात आहे.