Kho Kho World Cup: भारतात होणारा पहिला खो खो विश्वचषक! जाणून घ्या डिटेल्स
Kho Kho Game: या स्पर्धेत ६ महाद्वीपातील २४ देशांचा सहभाग असणार आहे. १६ पुरुष आणि १६ महिला संघ सहभागी होतील.
Kho Kho World Cup 2025: भारतीय खो खो फेडरेशन (KKFI) हे आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने २०२५ मध्ये भारतात पहिलावहिला खो खो विश्वचषक खेळवणार आहे. या स्पर्धेत ६ महाद्वीपातील २४ देशांचा सहभाग असणार आहे. १६ पुरुष आणि १६ महिला संघ सहभागी होतील. खो खो हा खेळ मूळचा भारतात आहे. हा खो खो विश्वचषक समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि खेळाची स्पर्धात्मक भावना अधोरेखित करेल. देशी पद्धतीने चिखलात सुरू झालेला आणि आता मॅटवर गेलेला हा खेळ सध्या जगभरातील ५४ देशात हा खेळ खेळला जात आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय खो-खो फेडरेशनने या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी १० शहरांमधील २०० उच्चभ्रू शाळांमध्ये या खेळाला नेण्याची योजना आखत आहे. विश्वचषकापूर्वी किमान ५० लाख खेळाडूंची नोंदणी करण्याच्या उद्देशाने फेडरेशन शालेय विद्यार्थ्यांसाठी सदस्यत्व मोहीम राबवणार आहे.
भारतीय खो खो फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुधांशू मित्तल यांनी आगामी कार्यक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला. ते म्हणाले की, "पहिल्या खो-खो विश्वचषकाचे यजमानपदासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ही स्पर्धा केवळ स्पर्धेचे उदाहरण म्हणून काम करणार नाही तर देशांना एकत्र आणेल, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवेल आणि खो-खोचे सौंदर्य आणि तीव्रता जगाला दाखवेल. २०३२ पर्यंत खो-खोला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळणे हे आमचे अंतिम ध्येय आहे आणि हा विश्वचषक त्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.
खेळाडूंना मिळणार मोठं व्यासपीठ
या स्पर्धेत जगभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी त्यांचे कौशल्य, चपळता आणि सांघिक कार्य दाखवण्यासाठी मोठं व्यासपीठ मिळणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या सामन्यांची मालिका असेल. दरम्यान, खो-खो विश्वचषकाचे उद्दिष्ट या देशी भारतीय खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आहे. .या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करून भारतीय खो खो फेडरेशन 2032 पर्यंत ऑलिम्पिक खेळांमध्ये खो-खोचे स्थान सुरक्षित करण्याची आकांक्षा बाळगते. हा या खेळासाठी एक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा असेल.
खो खो फेडरेशन ऑफ इंडिया बद्दल
खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया (KKFI) ही भारतातील खो-खोची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. या संस्थेचे श्री सुधांशू मित्तल हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. सर्व राज्य संघटना राष्ट्रीय फेडरेशनशी संलग्न आहेत जे दरवर्षी पुरुष, महिला आणि कनिष्ठ वर्गांसाठी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करतात.