पाकिस्तान टीमवर पुन्हा फिक्सिंगचे आरोप
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत.
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम पोहोचली आहे पण आता पाकिस्तानच्या या कामगिरीवर खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. पाकिस्तानची टीम मॅच फिक्स करून फायनलमध्ये आल्याचा धक्कादायक दावा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आमिर सोहेलनं केला आहे.
सरफराजला हे सांगायची गरज आहे की त्याच्या टीमनं काही कमाल केलेली नाही. तुम्हाला कोणीतरी मॅच जिंकवून दिली आहे. तुम्हाला काही कारणांसाठी फायनलमध्ये आणलं गेलं आहे, त्यामुळे जास्त उडू नका. तुमची काय लायकी आहे ते आम्हाला माहिती आहे. असं वक्तव्य आमिर सोहेलनं केलं आहे. पाकिस्तानमधल्या एका न्यूज चॅनलवर बोलताना सोहेलनं हे आरोप केले आहेत.