रशिया : रशियात होणा-या २०१८ फुटबॉल वर्ल्ड कपचा आज ड्रॉ जाहीर होणार आहे. फुटबॉल जगतातील सर्वोत्तम ३२ टीम्स या वर्ल्ड कपमध्ये अजिंक्यपदासाठी भिडणार आहेत. डिफेंडिंग चॅम्पियन जर्मनी पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. 


पॉट वनमध्ये कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर्मनी, ब्राझील, अर्जेन्टीना, फ्रान्स, युरोपियन चॅम्पियन पोर्तुगाल, बेल्जियम, पोलंड आणि यजमान रशिया पॉट वनमध्ये आहेत. त्यामुळे आता हा वर्ल्ड कपचा ड्रॉ कसा निघतो. आणि यातील कुठला ग्रप हा ग्रुप ऑफ डेथ ठरणार आहे ते काही काळातच स्पष्ट होणार आहे.


इटली आणि नेदरलँड्स बाहेर


इटली आणि नेदरलँड्स सारख्या टीम या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरु शकल्या नाहीत. तर आईसलँड आणि पनामा या दोन टीम पहिल्यांदाच वर्ल्डज कपसाठी पात्र झाल्या आहेत.