मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं वर्ल्डकपमध्ये थेट एन्ट्री घेणाऱ्या 'सुपर १२' टीम्सची घोषणा केलीय. यामध्ये सर्वोच्च रँकिंग मिळवून पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगानिस्तान यांनी थेट एन्ट्री मिळवलीय. मात्र, यामध्ये माजी चॅम्पियन श्रीलंका आणि बांग्लादेशला घसरत्या रँकिंगमुळे पुरुष टी २० मध्ये थेट एन्ट्री मिळालेली नाही. आता त्यांना २०२० मध्ये होणाऱ्या या टूर्नामेंटमध्ये जागा बनवण्यासाठी इतर सहा क्वॉलिफायर्ससोबत खेळावं लागेल.


ही टूर्नामेंट १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे. क्वॉलिफिकेशन नियमांनुसार सर्वोच्च आठ टीम्सना थेट 'सुपर १२'मध्ये जागा मिळते... तर उरलेल्या दोन टीम्सना इतर टीम्ससोबत क्वालिफायर मॅच खेळावी लागेल.



">इतर क्वॉलिफायर टीम्सची निवड २०१९ मध्ये होणाऱ्या आयसीसी टी २० वर्ल्डकप क्वॉलिफायर्समधून होईल. त्यात इतर चार टीम्स आपापल्या जागा सुनिश्चित करतील.