‘या’ दिग्गज खेळाडूने विराट कोहलीला दिलं ‘हे’ चॅलेन्ज!
सध्या टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. या दौ-यात टीम इंडिया फारच संघर्ष करताना दिसत आहे. आत्तापर्यंत तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामने जिंकून आघाडीवर आहे.
नवी दिल्ली : सध्या टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. या दौ-यात टीम इंडिया फारच संघर्ष करताना दिसत आहे. आत्तापर्यंत तीन टेस्ट सामन्यांच्या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिका दोन सामने जिंकून आघाडीवर आहे.
विलन बनला कोहली
ज्या विराट कोहलीचं भरभरून कौतुक केलं जात होतं. आज तोच विराट कोहली विलन बनून समोर आलाय. सेंच्युरियन टेस्टमध्ये भलेही विराटने विराट खेळी करत १५३ रन्स केले. पण त्याच्याकडून घेण्यात आलेले निर्णय आणि पत्रकार परिषदेत पत्रकाराशी केलेलं गैरवर्तन यामुळे त्याच्यावर टीका होतीये.
दक्षिण आफ्रिका दौ-यात विराट कोहलीने आत्तापर्यंत चार इनिंगमध्ये केवळ १९१ रन्स केले आहेत. या १९१ रन्समधून जर १५३ रन्स काढ्ले तर कोहली दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर फारच अडचणीत दिसला.
यांनी दिलं विराटला आव्हान
दरम्यान, वेस्टइंडिज क्रिकेट टीमचे माजी दिग्गज खेळाडू आणि लोकप्रिय कॉमेंटेटर मायकल होल्डिंग यांनी विराट कोहलीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत होल्डिंग विराटबाबत म्हणाले की, ‘विराट कोहली अद्भुत फलंदाज आहे. जर मला कुणी सध्या टॉप तीन खेळाडू निवडण्यास सांगितले तर त्यात नक्कीच कोहलीचं नाव घेणार. तो खूप चांगला खेळाडू आहे.
"जर तो मला इंग्लंडमध्ये रन करताना दिसला तर मी त्याला वर्ल्ड क्रिकेटमधील महान खेळाडू मानेल. मला तो खेळाडू पसंत आहे, जो प्रत्येक जागेवर रन्स करू शकेल".
सध्याच्या स्थितीत जो रूट, विराट कोहली आणि स्टीव स्मिथ वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ आणि टॉप तीन फलंदाज आहे. एबी डिविलियर्स आत्ताच टेस्ट क्रिकेटमध्ये परत आलाय. बघुया तो कसा प्रदर्शन करतो...."
कसा आहे इंग्लंडमधील रेकॉर्ड
विराट कोहलीचा इंग्लंडमध्ये आजपर्यंतचा रेकॉर्ड काही खास राहिलेला नाहीये. कोहलीने आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण ५ टेस्ट सामने खेळले आहेत. आणि १३.४० च्या सरासरीने त्याने एकूण १३४ रन्स केले आहेत. यात त्याचं सर्वात चांगलं प्रदर्शन ३९ रन्स हे होतं.