लैलेश बारगजे, नगर, झी मीडिया : टीम इंडियाचा (Team India) माजी क्रिकेटर विनोद कांबळी (vinod kambli) याच्यावर आर्थिक संकट ओढवल्याचे वृत्त प्रसिद्ध माध्यमांत झळकलं होत. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर त्याचा गुजरान सुरु असल्याची माहिती देखील समोर आली होती. तो आर्थिक गर्तेत सापडल्याच्या वृत्तानंतर आता त्याच्यासाठी मदतीची हात पुढे आला आहे. एका मराठी उद्योजकाने त्याला जॉबची ऑफर दिली आहे. हा जॉब काय आहे? व त्याला किती पगार मिळणार आहे? ते जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कांबळी  (vinod kambli) आर्थिक गर्तेत सापडला आहे. ‘बीसीसीआय’कडून मिळणाऱ्या ३० हजार रुपये निवृत्तिवेतनावर त्याचं घर चालंतय. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विनोद कांबळी याला मराठमोळे अहमदनगरचे युवा उद्योजक संदीप थोरात यांनी जॉब ऑफर केला आहे. संदीप थोरात यांच्या सह्याद्री उद्योग समूहातील फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील व्यवस्थापन समितीवर विनोद कांबळी  (vinod kambli) यांना नोकरी देण्यात येणार आहे. या जॉबसाठी त्यांना एक लाख पगारही देण्यात येणार असल्याचे थोरात यांनी म्हटलं आहे. 


1990 च्या दशकात विनोद कांबळी  (vinod kambli) यांनी क्रिकेटमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्यावर आलेल आर्थिक संकट हे दुर्दैवी असल्याचे संदीप थोरात यांनी म्हटलेय. थोरात पुढे म्हणाले, अशा खेळाडूंना सरकारने देखील मदतीचा हात पुढे केला पाहिजे, मात्र दुर्दैवाने तस होताना दिसत नाही. म्हणूनच त्यांना नोकरी देऊन आपण मदतीचा हात देत नसून त्यांना स्वाभिमानाची वागणूक देत असल्याचं देखील थोरात यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान आर्थिक गर्तेत सापडलेल्या विनोद कांबळी  (vinod kambli) आता या मराठमोळ्या उद्योजकाची जॉबची ऑफर स्विकारणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.