Bruce Alexander Grenfell Murray Died: सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात वनडे मालिका खेळला जात आहे. रंगदार स्थितीत पोहोचलेल्या या मालिकेत कोण बाजी मारणार?  याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता न्यूझीलंड टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडचे माजी जिग्गज क्रिकेटपटू (Former New Zealand cricketer) ब्रूस अलेक्झांडर ग्रेनफेल मरे (Bruce Murray Died) यांच्या निधनाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडवर शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय. (Former New Zealand cricketer Bruce Alexander Grenfell Murray Died at age of 82 latest marathi sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू, शिक्षक (Teacher) तसेच इतिहासकार (historian) आणि लेखक ब्रूस अलेक्झांडर ग्रेनफेल मरे यांचं निधन (Bruce Alexander Grenfell Murray Died) झालं आहे. ब्रूस  मरे यांनी 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 10 जानेवारी रोजी रात्री उशिरा त्यांनी जगाला निरोप दिला आहे. अवघ्या काही दिवसात ब्रूस अलेक्झांडर ग्रेनफेल मरे प्रसिद्धीच्या झोतात आले होते.  ब्रूस म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमहत्व... त्यांनी न्यूझीलंडसाठी 13 टेस्ट सामने खेळले. मात्र, त्यांची चर्चा आजही होताना दिसते.


ब्रुस मरे फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नव्हते. त्यांनी हजारे विद्यार्थ्यांना शिकवलं, अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. न्यूझीलंडच्या प्रतिभावान कुटुंबातील व्यक्ती अशी त्यांची ओळख. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू अमेलिया केर (amelia kerr) आणि जेस केर (Jess Kerr) देखील याच कुटुंबातील आहेत


आणखी वाचा - बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल


सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानमध्ये ( New Zealand tour of Pakistan) खेळत आहे. याच पाकिस्तानला लोळवण्याचा पराक्रम ब्रुस मरे यांनी केला होता. ब्रूस मरे हे न्यूझीलंडच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयाचा भाग होते. त्यांनी 1969 साली लाहोर कसोटी (Lahore Test) सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या ब्रुस मरे यांनी किवी संघाच्या पहिल्या डावात 91 धावांची धुवांधार पारी खेळली होती. या खेळीच्या जोरावर त्यांनी न्यूझीलंडने ऐतिहासिक विजय मिळवला होता.