टीम इंडिया साखळी फेरीतून बाहेर, पण `या` भारतीयाने जिंकला टी 20 वर्ल्ड कप, कोण आहे तो?
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2021(ICC T20 World Cup 2021) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मात करत पहिल्यांदा चॅम्पियन ठरली.
दुबई : ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप 2021च्या (T 20 World Cup 2021) अंतिम सामन्यात (Australia vs New Zealand) न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव केला. यासह ऑस्ट्रेलिया टी 20 चॅम्पियन ठरली. टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजली जात होती. मात्र टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकता आला नसला तरी एका भारतीयाने मात्र टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. नक्की कोण आहे तो, त्याच्याबाबत आपण जाणून घेऊयात. (former team india player Sridharan Sriram is win T 20 world cup 2021 with australia team he is coaching consultant)
ऑस्ट्रेलियासह एका भारतीयाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) असं या भारतीयाचं नाव आहे. श्रीधरन हे ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे सपोर्ट स्टाफ आहेत. श्रीधरन हे ऑस्ट्रेलियाचे असिस्टेंट कोच आहेत.
श्रीधरन हे 2015 मध्ये ऑस्ट्रेलियासोबत बॉलिंग असिस्टेंट म्हणून जोडले गेले होते. त्यांची चमकदार कामगिरी पाहत त्यांना ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने असिस्टेंट कोच केलं. श्रीधरन हे एरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत.
विशेष म्हणजे श्रीधरन यांनी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी टीम इंडियाकडून 8 वनडे सामन्यांमध्ये 81 धावा केल्या आहेत. श्रीधरन आयपीएलमध्ये आरसीबी टीमचे कोचिंग स्टाफ राहिले आहेत.
ऑस्ट्रेलिया टी 20 चॅम्पियन
या अंतिम सामन्यात पहिले बॅटिंग करत न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 173 धावांचं आव्हान मिळालं. कांगारुंनी हे आवहान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.