Suryakumar Yadav VIDEO: टीम इंडियाच्या मागे जणू दुखापतींचं ग्रहण लागलंय. नुकतंच टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव दुखापतीने ग्रस्त आहे. सूर्या किमान 7 आठवडे मैदानापासून दूर राहणार असल्याची शक्यता आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सिरीज टीम इंडियाने 1-1 अशी बरोबरीत सुटली. याच सिरीजमध्ये सूर्याला दुखापत झाली होता. यानंतर आता सूर्याचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये तो कुबड्यांच्या सहाय्याने चालताना दिसतोय. 


सूर्याने शेअर केला खास व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमारने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो कुबड्यांच्या मदतीने चालतोय. मुख्य म्हणजे दुखापत झाली असून देखील तो मजा करायलाही विसरला नाहीये. या व्हिडिओवर त्याने वेलकम या बॉलिवूड सिनेमातील 'मेरी टांग नकली है...' हा प्रसिद्ध डायलॉग जोडलाय. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही भरभरून मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यावेळी यूजरने त्याच्या पोस्टवर कमेंट करत 'मोये मोये' असं लिहिलंय.



दुखापतीबाबत दिले मोठे अपडेट 


त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'थोडसं गंभीर पण, दुखापत कधीही गंमत नसते. मी ते गांभीर्याने घेईन आणि लवकरच पूर्ण फीट होण्याचं प्रॉमिस करतो! तोपर्यंत, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुट्टीचा आनंद लुटत असाल.


अफगानिस्तानविरूद्ध सूर्या खेळणार का?


भारताला जानेवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. सूर्यकुमार या सिरीजमध्ये खेळू शकेल की नाही याबाबत त्याने कोणतेही अपडेट देण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयने अजून अफगाणिस्तान सिरीजसाठी टीमची घो।णा केलेली नाही. सूर्या खेळणार की नाही हे त्याच्या घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे. ही सिरीज 11 जानेवारीपासून भारतात खेळवली जाणार आहे. 


तिसऱ्या टी-20 सामन्यात झाली होती दुखापत


जोहान्सबर्गमध्ये टी-20 सिरीजमधील तिसऱ्या सामन्यात फिल्डींग करताना सूर्याच्या घोट्याला मार लागला होता. मात्र त्यानंतरही त्याने मैदान सोडलं नव्हतं. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेहून परतल्यानंतर सूर्याचे स्कॅनिंग करण्यात आलं. त्यानंतर घोट्याला ग्रेड-2 दुखापत झाल्याची माहिती समोर आलीये.