मुंबई : अनेक क्रिकेटर्स त्यांच्या खसगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. तर काही त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे... पण काही क्रिकेटर्स असे आहेत, जे कायम त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आले... असे चार क्रिकेटर्स आहेत, जे त्यांच्या कामांमुळे तर चर्चेत आले... पण  त्यांच्यांवर अनेक आरोप देखील करण्यात आले. यामध्ये दोन भारतीय क्रिकेटर्स आहेत. एकावर तर बलात्काराचे आरोप आहे. आशाचं क्रिकेटर्सबद्दल आज जाणून घेवू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुबेल हुसैन
बांग्लादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनवर 2015 सालच्या वर्ल्ड कपपूर्वी एका महिलेने लग्नाचं आमिष देवून बलात्कार केल्याचा आरोप केला. महिलेच्या आरोपांनंतर त्याच्याविरोधात खटला देखील दाखल झाला. एवढंच नाही तर रूबेलला संघातून काढण्याची मागणी जोर धरू लागली. पण बांग्लादेश क्रिकेट संघाने त्याला काढण्याचा निर्णय घेतला नाही. 



क्रिकेट संघाचा तो महत्त्वाचा निर्णय देशासाठी लाभदायक ठरला. त्याने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला केवळ उपांत्यपूर्व फेरीत नेले नाही तर इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याचा परिणाम त्या महिलेवर देखील झाला. विजयानंतर तिने सर्व आरोप मागे घेतले. 


मोहम्मद शमी
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर पत्नी हसीन जहाँने अनेक खटले दाखल केले होते, ज्यामध्ये हुंडा, मॅच फिक्सिंग आणि शारीरिक छळ यासारखे अनेक मोठे आरोप आहेत. पण चौकशीनंतर बीसीसीआयने शमी क्लीन चिट दिली. 



पण पोलिसांकडून शमीला क्लिन चिट मिळाली नाही. अद्यापही या प्रकरणावर शमी विरोधातात केस सुरू आहे.


ल्यूक पोमर्शबॅक



ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ल्यूक पोमर्शबॅक याच्यावर आयपीएल 2012 दरम्यान एका अमेरिकन महिलेसोबत गैरवर्तवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे त्याला अटक देखील करण्यात आली. यावेळी ल्यूकचं पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला. पण न्यायालयाबाहेर तडजोड करत प्रकरण मिटवण्यात आलं. 


एस श्रीसंत



आयपीएल फिक्सींगमध्ये नाव आल्यानंतर श्रीसंतच्या क्रिकेट करिअरवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं.  IPL-2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीसंतला अटक केली होती. काही दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला असला तरी बीसीसीआयने श्रीसंतवर कायमची बंदी घातली होती, जी नंतर 7 वर्षांची करण्यात आली.