IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट सामन्यांची सिरीज सुरु आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करत असून तर दूसऱ्या इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या हातात दिली आहे. या सिरीजचा चौथा सामना रांचीमध्ये २३ फेब्रुवारी पासून खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी तिकीटांच्या किंमतींची माहिती समोर आली आहे. 


तिसरा टेस्ट सामना सध्या राजकोटमध्ये सुरू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता. यामुळे सिरीज 1-1 च्या बरोबरीत आहे. तिसरा टेस्ट सामना हा सध्या राजकोटमध्ये खेळला जात आहे. 


रांचीमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तिकीटांची किंमत


रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये सर्वात कमी तिकीटांची किंमत ही 400 रूपये असणार आहे. सर्वात अधिक तिकीटांची किंमत ही २००० रूपये इतकी असणार आहे. जेएससीए अध्यक्ष संजय सहाय यांनी स्पष्ट केलंय की, विंग 'ए' आणि विंग 'सी' च्या लोअर टीयर ची किंमत ४०० रूपये प्रतिदिवस इतकी असणार, तर विंग 'बी' आणि विंग 'डी' च्या लोअर टीयर ची किंमत ५०० रूपये प्रतिदिवस इतकी असणार आहे.


प्रीमियम टॅरेसच्या तिकीटाची किंमत 700 रुपये


या व्यतिरिक्त अमिताभ चौधरी पवेलियनमध्ये प्रीमियम टॅरेसचे 700 रूपये प्रतिदिवस, प्रेसिडेंट एनक्लोजर चे 2000 रूपये प्रतिदिवस, हॉस्पिटैलिटी बॉक्सचे 1500 रूपये प्रतिदिवस आणि कॉरपोरेट बॉक्सची किंमत 1200 रूपये प्रतिदिवस असणार असल्याची माहिती आहे.


  • विंग 'ए' आणि 'सी' : 400 रुपये प्रतिदिवस (लोअर टीयर)

  • विंग 'बी' आणि 'डी' : 500 रुपये प्रतिदिवस (लोअर टीयर)

  • अमिताभ चौधरी पवेलियन (नॉर्थ पवेलियन) प्रीमियम टेरिस : 700 रुपये  प्रतिदिवस

  • प्रेसिडेंट एनक्लोजर: 2000 रुपये प्रतिदिवस

  • हॉस्पिटैलिटी बॉक्स: 1500 रुपये प्रतिदिवस

  • कॉरपोरेट बॉक्स : 1200 रुपये प्रतिदिवस


दोन्ही टीम कधी पोहोचणार रांचीला


राजकोट टेस्ट संपल्यानंतर 23 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चौथ्या टेस्टमॅच साठी भारत आणि इंग्लंड या दोन्ही 20 फेब्रुवारीला रांचीला पोहोचण्याची शक्यता आहे. 


चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड:


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.


टेस्ट सिरीजसाठी इंग्लंडचा स्क्वॉड:


जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स एंडरसन, मार्क वुड, ओली रॉबिन्सन, डैन लॉरेंस आणि गस एटकिंसन.