पॅरिस : फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये स्वित्झर्लंडचा तिसरा मानाकिंत स्टानिसलास वावरिंका आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदाल यांच्यात लढत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वित्झर्लंडच्या वावरिंकानं सेमीफायनलमध्ये ब्रिटनच्या अव्वल सीडेड अँडी मरेवर मात करत फायनल गाठलीये. अतिशय रंतदार अशा लढतीत वावरिंकानं हा विजय साकारला. 6-7, 6-3, 5-7, 7-6, 6-1 नं त्यानं मरेचा पराभव केला. 


तर दुसरीकडे नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमिनित थिएमवर ६-३, ६-४, ६-० असा सहज विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला.