Virat चं नाव ऐकताच Gambhir पुन्हा भडकला, Dressing Room मध्ये जाताना केलं असं काही की...; पाहा Video
Gautam Gambhir Viral Video: प्रेक्षकांनी गौतम गंभीला डिवचलं. प्रेक्षकांनी विराट विराटच्या (Virat Kohli) घोषणा सुरू केल्या. गप आपला शिस्तीत ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) गंभीर विराटचं नाव ऐकताच चांगलाच भडकला.
Virat Kohli vs Gautam Gambhir: आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद चांगलाच गाजलाय. आयपीएल सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संघर्षामुळे (Virat Kohli Gautam Gambhir Controversy) क्रीडा विश्वात एक वेगळंच युद्ध सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. कोहली आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकचकमुळे दोन्ही खेळाडूंवर दंड देखील लावण्यात आलाय. एवढंच काय तर दोघांना बॅन केलं पाहिजे, अशी मागणी होताना दिसते. अशातच आता गौतम गंभीरचा आणखी एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.
लखनऊच्या एकाना स्टेडियम स्टेडियमवर 3 मे रोजी यजमान लखनऊ आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात सामना खेळला गेला. मात्र, हा सामना पावसामुळे वाया गेल्याचं दिसून आलं. या सामन्यात लखनऊच्या फलंदाजीची मात्र दैना उडाली. सामना अर्ध्यावर आला असताना पावसाने व्यत्य आणला आणि सामना रद्द करावा लागला. यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं. मात्र, प्रेक्षक गप्प बसतील, तर खरं... मैदानावरील प्रेक्षकांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Gambhir Viral Video) होत आहे.
नेमकं काय झालं?
व्हायरल व्हिडिओमध्ये, गौतम गंभीर खेळाडू अमित मिश्रा आणि माजी टीममेट विजय दहियासोबत ड्रेसिंग रुमच्या (Dressing Room) पायऱ्या चढताना दिसतोय. त्यावेळी प्रेक्षकांनी गौतम गंभीला डिवचलं. प्रेक्षकांनी विराट विराटच्या घोषणा सुरू केल्या. गप आपला शिस्तीत ड्रेसिंग रूममध्ये गंभीर विराटचं नाव ऐकताच चांगलाच भडकला. दोन सेकंद थांबला आणि थेट प्रेक्षकांना खुन्नस दिली. त्याचा व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहे.
आणखी वाचा - IPL 2023 Playoffs: ना राजस्थान ना लखनऊ, हरभजन म्हणतो 'या' चार टीम प्लेऑफमध्ये खेळणार!
दरम्यान, विजय दहिया आणि अमित मिश्रा देखील गंभीरला पाहून थांबले. मात्र, दोघांनी पुढे जाण्याचा इशारा केला आणि गंभीर ड्रेसिंग रूमकडे वळाला. पावसामुळे अनेक प्रेक्षकांनी आधीच घरचा रस्ता धरला होता. मात्र, काहीजण सामना सुरू होईल, या अपेक्षेने थांबले होते. त्याचवेळी हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.
पाहा Video
विराट गंभीर वादाचं हे प्रकरण चांगलंच चर्चेत असल्याचं दिसतंय. क्रिडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त करत दोघांना खडेबोल सुनावले आहेत. एवढंच काय तर गंभीरला जिगरी मित्र वीरेंद्र सेहवागने गंभीरसह विराटला बॅन केलं पाहिजे, बीसीसीआय हे करू शकतं, अशी विनंती केली आहे.