मोठी बातमी! गौतम गंभीर हेड कोच होताच `या` 3 खेळाडूंना टीम इंडियामधून डच्चू?
Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला अखेर हेड कोच मिळालाय. गौतम गंभीरने जबाबदारी स्विकारल्यानंतर टीम इंडियामधून 3 खेडाळूंची गंच्छती निश्चित मानली जातेय.
Gautam Gambhir Becomes Team India Head Coach : भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कपवर 17 वर्षांनंतर नाव कोरल्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर टीम इंडियाची जबाबदारी कोणाकडे अशी चर्चा सुरु असताना गौतम गंभीरच नाव आघाडीवर होतं. मंगळवारी अखेर टीम इंडियाला त्याचा नवीन हेड कोच मिळालाय. हेड कोचच्या शर्यतीत गौतम गंभीरने बाजी मारलीय. (Gautam Gambhir becomes the head coach will these 3 players be removed from Team India)
'या' 3 खेळांडूना टीम इंडियामधून डच्चू?
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गौतम गंभीरच्या नावाची घोषणा केली. गौतम गंभीरने जबाबदारी स्विकारल्यानंतर टीम इंडिया प्रथमच श्रीलंकेसोबत दोन हात करणार आहे. भारतीय संघ 27 जुलै 2024 पासून 3 वनडे आणि 3 टी-20 सामने श्रीलंकेविरोधात खेळणार आहे. पण गौतम गंभीरने हेड कोचची जबाबदारी स्विकारल्यानंतर तीन खेळाडूंना डच्चू देण्यात येणार असं म्हटलं जातंय.
अजिंक्य रहाणे
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची बॅट बऱ्याच दिवसांपासून शांत आहे. त्यामुळेच सक्रिय खेळाडू असूनही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. रहाणे आधीच टी-20 आणि एकदिवसीय फॉरमॅटमधून बाहेर पडला होता. त्याच वेळी, तो कसोटी फॉरमॅटमध्येही पुनरागमन करू शकला नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे सध्याचे वय 36 वर्षे आहे. संघाचे नवे प्रशिक्षक युवा खेळाडूंना अधिक संधी देण्याच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.
चेतेश्वर पुजारा
रहाणेप्रमाणेच चेतेश्वर पुजाराची बॅटही गेल्या काही काळापासून काही जादू दाखवू शकली नाही. यामुळेच तो काही काळापासून संघाचा नियमित सदस्यदेखील नाही. पुजाराचे सध्याचे वय 36 वर्षे आहे. मैदानात त्याच्या फिटनेसवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने गौतम त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा सामना विजेता खेळाडू रवींद्र जडेजाची कामगिरीही अलीकडच्या काळात झपाट्याने घसरताना पाहिला मिळतेय. मैदानात गोलंदाजी करताना तो विकेटसाठी झगडताना पाहिला मिळतोय. शिवाय तो बॅटनेही विशेष करिष्मा दाखवू शकत नाही. त्यामुळे त्यालाही गौतम बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
'या' खेळाडूंना मिळणार संधी?
दरम्यान 42 वर्षीय गौतम गंभीरवर हेड कोचची जबाबदारी दिल्यानंतर गौतम युवा खेळाडूंना संघात संधी देण्याची शक्यता आहे. खरं तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या तिन्ही सपोर्ट स्टाफचा कार्यकाळही संपलाय. त्यामुळे गौतम या दिग्गज खेळाडूंच्या जागी नवीन चेहरे शोधत आहे. त्यांनी काही खेळांडूशी संवाद साधला आहे, असं समोर आलंय. RevSportz Global ने दिलेल्या वृत्तानुसार, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम राहू शकतात. तर गौतम गंभीरने अभिषेक नायरला टीम इंडियाचा बॅटिंग कोच आणि विनय कुमारला बॉलिंग कोच बनवण्याची मागणी केलीय.