नवी दिल्ली : गौतम गंभीरला यावेळी केकेआरने खरेदी केलेलं नाही किंवा आरटीएमचाही वापर केलेला नाही. गौतम गंभीरने नेहमीच केकेआरला नेतृत्व दिलं आहे, टीमला एका चांगल्या उंचीवर आणून ठेवलं आहे. मात्र यामागील कारण जरा वेगळंच आहे.


आयपीएलचा अकराव्या मोसमासाठी लिलाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव सुरु आहे. यात चांगल्या खेळाडूंना संघात घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चढाओढ सुरु आहे. काही फ्रँचायझींनी दिग्गज खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे, तर काही फ्रँचायझींनी असे निर्णय घेतले, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.


कोलकाता नाईट रायडर्सच्या निर्णयाचाही धक्का


कोलकाता नाईट रायडर्सच्या निर्णयानेही असाच धक्का बसला आहे. २०१२ आणि २०१४ साली केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या कर्णधार गौतम गंभीरला केकेआरने यावेळी रिटेन केलं नाही. शिवाय लिलावातही त्याला मॅच टू राईटचा  म्हणजेच आरटीएमचा वापर करत खरेदी केलं नाही.


दिल्ली डेअरडेव्हिल्सला २.८ कोटी रुपयांमध्ये खरेदी


गंभीरला दिल्ली डेअरडेव्हिल्सने २.८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. या किंमतीत कोलकात्याला गंभीरला खरेदी करण्याची संधी होती. मात्र त्यांनी आरटीएमचाही वापर केला नाही. केकेआरने असं का केलं हे याविषयी सर्वांना प्रश्न पडला.


वेगळं होण्याचा निर्णय स्वतः गंभीरचा


मात्र, कोलकात्यापासून वेगळं होण्याचा निर्णय स्वतः गंभीरनेच घेतला होता, असं कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंकी मैसूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 


गंभीरला नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा!


गंभीरला नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छाही देताना मैसूर म्हणाले, 'गौतम गंभीर हा केकेआरच्या धोरणाचा एक भाग होता. मात्र त्याने स्वतःच विनंती केली होती, की मला आरटीएमनेही खरेदी करु नका.'