Gautam Gambhir Helps India Spinner: भारताला 2011 साली एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषक जिंकून देण्यासाठी अंतिम सामन्यात भन्नाट कामगिरी करणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) सध्या चर्चेत आहेत. इंडियन प्रमिअर लिगच्या 16 व्या पर्वामध्ये (IPL 2023) लखनऊ सुपर जायंट्सची मेन्टॉरशीप गौतम गंभीरकडे आहे. बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स आणि लखनऊ सुपर जायंट्सदरम्यानच्या सामन्यामध्ये बंगळुरुने विजय मिळवल्यानंतर मैदानात विराट कोहलीबरोबर (Gautam Gambhir Vs Virat Kohli) वाद घातल्याने गंभीर चर्चेचा विषय ठरतोय. विराट आणि गंभीरसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी मैदानावर अशापद्धतीचं वर्तन केल्याबद्दल चाहत्यांबरोबरच क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. या वादावरील चर्चा सुरु असतानाच आता गंभीर एका सकारात्मक गोष्टीमुळे चर्चेत आहे. गौतम गंभीरने मदत केल्यामुळे एका भारतीय क्रिकेटपटूच्या सासूचे प्राण वाचला आहे. यासंदर्भातील माहिती या क्रिकेटपटूनेच सोशल मीडियावरुन दिली आहे.


नक्की कोणाला केली मदत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, भारताचा माजी फिरकीपटू राहुल शर्मा याने ट्वीटरवरुन गौतम गंभीरचे आभार मानले आहेत. गौतम गंभीरने आपल्याला सासूच्या आजारपणादरम्यान मदत केल्याचं राहुलने म्हटलं आहे. मागील महिन्यामध्ये राहुल शर्माच्या सासूची ब्रेनहॅमरेज सर्जरी झाली. याचबद्दल राहुलने ट्वीटरवरुन एक पोस्ट केली आहे. राहुलने त्याची पत्नी आणि सासूबरोबरचे फोटो पोस्ट केले असून त्याबरोबर एक नोटही पोस्ट केली आहे.


काय म्हटलं आहे राहुल शर्माने?


"मागील महिना आमच्यासाठी फार कठीण गेला. माझ्या सासूला ब्रेनहॅमरेजचा झटका आला. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मी गौतम गंभीर आणि त्याच्या पीए गौरव अरोरा यांचे आभार मानतो. त्यांनी मला या कठीण काळामध्ये फार मदत केली. त्यांनी मला एक उत्तम न्युरोलॉजिस्ट आणि चांगलं रुग्णालय अगदी कमी वेळात शोधण्यासाठी आणि तिथे सर्व सुविधा मिळतील यासंदर्भातील काळजी घेतली. ही सर्जरी यशस्वी ठरली," असं राहुलने या नोटमध्ये म्हटलं आहे. याच पोस्टमध्ये राहुल शर्माने ही शस्त्रक्रीया गंगाराम रुग्णालयामध्ये पार पडली. राहुलने रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टर मनिष चौघ यांचे आभार मानले आहेत. 



गंभीरने केलेल्या या मदतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सोशल मीडियावरुन गौतम गंभीरवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी गंभीर कायमच अशापद्धतीची मदत करतो असं म्हटलं आहे.


1) तुझा अभिमान वाटतो



2) गौतम भाई बेस्ट आहे



3) तो नेहमीच मनं जिंकतो...



4) गौतम गंभीरचे आभार...



5) उत्तम मित्र...



राहुल शर्मा मागील वर्षी झाला निवृत्त


राहुल शर्माने 2022 साली 28 ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. राहुल शर्माने 2011 साली एकदवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तो 4 सामने खेळला ज्यात त्याने 6 विकेट्स घेतल्या. तो या मालिकेमध्ये 2 टी-20 सामने खेळला. टी-20 मध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या. याचबरोबर राहुल शर्माने 44 आयपीएल सामने खेळले असून एकूण 40 विकेट्स घेतल्या आहेत.