Gautam Gambhir Emotional Tribute to KKR Fans : टीम इंडियाच्या हेड कोचपदी नियुक्ती झाल्यानंतर आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाताच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार झाला आहे. अशातच आता गौतमने आपल्या चॅम्पियन टीमसाठी खास व्हिडीओ तयार केलाय. यामध्ये गौतम गंभीर केकेआरला निरोप देताना दिसतोय. तुम्ही हसता तेव्हा मी हसतो. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा मी रडतो, अशा कवितेच्या ओळी गौतम गंभीरने व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. तुम्ही भावनिक आहात हे मला माहीत आहे, पण आम्ही एक संघ आहोत, असं गंभीरने त्याच्या व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे.


नेमकं काय म्हणाला गौतम गंभीर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता वेळ आली आहे जेव्हा आपल्याला एकत्र काही वारसा तयार करायचा आहे. वेळ आली आहे जेव्हा आपल्याला काही मोठ्या आणि ठळक स्क्रिप्ट लिहायच्या आहेत. स्क्रिप्ट जांभळ्या शाईने नाही तर त्या निळ्यामध्ये, खजिना असलेला भारताच्या निळ्या कपड्यांचा... आम्ही दोघे आम्ही एकमेकांना वचन देतो की आम्ही नेहमी खांद्याला खांदा लावून चालणार, हे सर्व आपल्या भारतासाठी असेल, असं गौतम गंभीरने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.


पाहा Video



दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने 2012 साली पहिल्यांदा गौतम गंभीर याच्या नेतृत्वात चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत पहिल्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. 2014 साली गंभीरच्या कॅप्टन्सीत केकेआर विजेता ठरली होती. अशातच गंभीरला कोच बनवताच गंभीरने केकेआरला पुन्हा विजयाची चव चाखून दाखवली. आता गंभीरसमोर टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कप जिंकवण्याचं आव्हान असणार आहे.