नवी दिल्ली : २०१९ मध्ये क्रिकेट जगतातली सगळ्यात मोठी स्पर्धा असलेला वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. मे ते जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी भारतीय टीममध्ये कोणाला संधी देण्यात यावी, याबद्दल प्रत्येक जण स्वत:च मत मांडतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही वर्ल्ड कपसाठीची त्याची १५ जणांची भारतीय टीम सांगितली आहे. गौतम गंभीरच्या टीममधली बहुतेक नावं ही अपेक्षित आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीरनं त्याच्या टीममध्ये विकेट कीपर म्हणून धोनी आणि कार्तिकची निवड केली आहे. तर ऋषभ पंतला गंभीरच्या टीममध्ये जागा नाही. बॉलिंगमध्ये गंभीरनं रवींद्र जडेजाच्याऐवजी आर.अश्विनला जागा दिली आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे रवींद्र जडेजानं आशिया कपमधून भारताच्या वनडे टीममध्ये पुनरागमन केलं होतं.


निलंबनानंतर पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि केएल राहुललाही गौतम गंभीरनं त्याच्या वर्ल्ड कप टीममध्ये स्थान दिलं आहे. हार्दिक पांड्या हा सध्या न्यूझीलंडमध्ये वनडे सीरिज खेळतोय, तर केएल राहुल इंग्लंड लायन्सविरुद्धच्या भारत ए टीमचा हिस्सा आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुले दोघांचं निलंबन झालं होतं. अखेर बीसीसीआयनं या दोन्ही खेळाडूंचं निलंबन मागे घेतलं.


वर्ल्ड कपसाठी गौतम गंभीरची भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, एमएस धोनी, अंबाती रायुडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव