नवी दिल्ली : टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने सोशल मीडियात चांगलाच अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याने नुकताच क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैनासाठी एक खास मेसेज शेअर केलाय. 


कशासाठी दिला मेसेज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीरने प्रिय़ंकाला शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, ती समाजातील महिलांसाठी चांगलं काम करेल. गंभीर स्वत: शुभेच्छा दिल्यानंतर त्याने लोकांनाही प्रियंकाला शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. प्रियंका रेडिओवर एक शो करणार आहे. या शोच्या माध्यमातून ती समाजातील महिलांच्या चांगल्यासाठी जागरूकता निर्माण करणार आहे. 



सुरेश रैनाचा रिप्लाय


गंभीरच्या शुभेच्छांवर सुरेश रैनाने रिप्लाय दिलाय. त्याने लिहिले की, ‘गंभीर, धन्यवाद! तू सुद्धा गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासंबंधी शानदार काम करत आहेस. तुझ्या या कामासाठी तूझा अभिमान वाटतो’.