Gautam Gambhir Quit Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारण करणार नाहीये. याबाबत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे विनंती केली आहे. गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 2019 मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक जिंकून गौतम गंभीर  ( Gautam Gambhir ) संसदेत पोहोचला.


गंभीरने सोशल मीडियावर लिहीली पोस्ट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने  ( Gautam Gambhir ) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.



2019 मध्ये केला होता भाजपमध्ये प्रवेश


टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने 3 डिसेंबर 2018 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर, त्याच्या राजकारणात प्रवेश केल्याबद्दल अटकळ बांधली जात होती. अखेरीस 22 मार्च 2019 रोजी त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्याला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं.


2019 मध्ये खासदार बनला गंभीर


राजकारणातील इनिंगला सुरुवात करतेवेळी गौतम गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते. त्याने आप उमेदवार आतिशी मार्लेना आणि काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा ३९१२२२ मतांनी पराभव केला होता. यावेली गंभीरला सुमारे सात लाख मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांना सुमारे तीन लाख मते मिळाली.