मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आज सागरिका घाटगेशी विवाहबद्ध झाला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले. २७ नोव्हेंबरला मुंबई स्थित ताजमहाल पॅलेस अँड टॉवरमध्ये या दोघांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झहीर आणि सागरिकाच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली. सोशल मीडियावरुन या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. या दोघांचे फोटोही चांगलेत व्हायरल झाले. 


यातच झहीर खानचा जुना मित्र आणि सहकारी गौतम गंभीरनेही दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. गौतम गंभीरने ट्विटरद्वारे झहीरला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात. 


गंभीरने ट्विट करताना म्हटलंय,  अभिनंदन झहीर आणि सागरिका! अखेर झहीरवर बाऊंसर टाकणारी कोणतरी आलीच. इतकंच बोलून गंभीर थांबला नाही तर त्याने झहीरला सल्लाही दिलाय.


गौतम पुढे म्हणाला, भावा मी तुला स्वत:च्या अनुभवावरुन सांगतोय की जेव्ही पत्नीकडून बाऊंसर आला तर कधीही त्याला हिट कऱण्याचा विचार करु नकोस, एकतर त्याला डक कर अथवा लाईनवरुन दूर हो. 


गौतम गंभीरने या ट्विटमध्ये युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनाही टॅग केलंय. झहीर, युवराज आणि भज्जी यांच्या लग्नामधील एक कॉमन गोष्ट म्हणजे या तिघांनीही सिने अभिनेत्रींशी लग्न केलंय. हरभजनचे लग्न गीता बसराशी झाले. हरभजनने हेझल कीच हिच्याशी लग्न केलंय. त्यानंतर आता झहीर खानने सागरिकाशी लग्न केलंय.



झहीर खानने या वर्षी एप्रिलमध्ये सागरिका घाटगेशी साखरपुडा केला होता. दोघेही काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते.