India vs Australia 1st Test Shami bowled Warner Stumps flying: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी चषक (Border-Gavaskar Trophy 2023) स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. नागपूरमध्ये आजपासून पहिल्या कसोटीला सुरुवात झाली असून पाहुण्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र प्रथम फलंदाजीचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर चुकीचा आहे की काय असं वाटू लागलं जेव्हा मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला एलबीडब्ल्यू बाद केले. त्यानंतर त्याच्या पुढल्याच षटकामध्ये मोहम्मद शमीने (Mohammed Shami) एका अप्रतिम चेंडूवर डेव्हीड वॉर्नरला (David Warner) बोल्ड केलं. वॉर्नरला काही कळण्याआधीच शमीच्या चेंडूने वॉर्नरला पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.


ऑफ स्टम्प हवेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमीने टाकलेल्या चेंडू वॉर्नरला चकवून ऑफ स्टम्पला आदळला. शमीने टाकलेली लेंथ डिलेव्हरी वॉर्नरला कळलीच नाही. ख्वाजा बाद झाल्यानंतर पुढच्याच काही चेंडूंमध्ये त्याच्यासोबत ओपनिंगला आलेला वॉर्नरही तंबूत परतला. शमीने टाकलेला पाठवलेला चेंडू एवढा उत्तम होता की कॉमेन्ट्री करणाऱ्या रवी शास्त्री आणि सुनिल गावस्कर यांनाही आश्चर्य वाटलं.


भन्नाट कॉमेन्ट्रीची साथ


"बोल्ड हिम! थ्रू हिज डिफेन्स. द ऑफ स्टम्प गोज फॉर अ वॉक अॅण्ड ऑस्ट्रेलिया टू डाऊन" असं म्हणत शास्त्रींनी शमीच्या या चेंडूचं वर्णन केलं. तर गावस्कर यांनीही शमीचं कौतुक करताना, "वॉट अ ब्युटीफूल डिलेव्हरी दीस हॅज बीन फ्रॉम मोहम्मद शमी," असे उद्गार काढले. शमी पहिल्या षटकामध्ये केवळ वॉर्मअप करत होता आणि पुढच्याच षटकात त्याने वॉर्नरला तंबूत पाठवलं असं वाटून गेल्याचंही गावस्कर म्हणाले. दुसऱ्या षटकामध्ये सिराजने घेतलेली विकेट या ठिकाणी शमीला आत्मविश्वास देण्यात नक्कीच कारणीभूत ठरल्याचंही गावस्कर म्हणाले. लेथ डिलेव्हरी ऑफ स्टॅम्पच्या शेंड्याला लागली आणि स्टम्प हवेत उडल्याचंही गावस्करांनी म्हटलं. "शमीची गोलंदांनी अगदी उत्तम आहे. यामध्ये वॉर्नरला काहीच करण्याची संधी हाताशी नव्हती," इतका हा चेंडू अप्रतिम होता असं गावस्कर म्हणाले.


1)



2)



दोन चेंडूत दोघे तंबूत


वॉर्नर आणि ख्वाजा झटपट बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या 84 वर असताना लॅबुशेननं विकेट सोडली. त्याच्या पुढच्याच चेंडूवर फलंदाजीला आलेल्या रेनशॉनला जडेजाने आपल्या फिरकीत गुंडाळत एका चेंडूमध्येच तंबूत पाठवलं.