मुंबई : ख्रिस गेलला युनिवर्स बॉस म्हटले जाते. त्याच्या तुफानी फलंदाजीसमोर मजबूच संघही धारातीर्थी पडतो. तो स्वत: एकट्याच्या जोरावर सामन्यात अनेकदा बाजी पलटतो. आयपीएल २०१८मध्ये त्याने अनेकदा हे करुन दाखवले. आयपीएलच्या या सीझनमध्ये गेलने केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही मस्ती आणि डान्स करत फॅन्सचे मनोरंजन केले. आता आयपीएल संपल्यानंतर एका स्पोटर्स् अॅवॉर्ड फंक्शनमध्ये ख्रिस गेल डोक्यावर पगडी घालून पंजाबी बनला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्याने गाण्यावर ठुमकेही लगावले. यावेळी इतर क्रिकेटर्ससोबत त्याने मजा मस्तीही केली. त्याने पगडी घातल्याने तो पंजाबीच दिसत होता. यावेळी हा शो होस्ट करणाऱ्या शिबानी दांडेकरने जुम्मा चुम्मा हे गाणे गायले. या गाण्यावर ख्रिस गेलने डान्स केला.