मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं सुरेश रैनाला संधी दिली. पण भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरला मात्र ही निवड पटलेली दिसत नाही. मी कर्णधार असतो तर रैनाऐवजी दिनेश कार्तिकला टीममध्ये घेतलं असतं, असं वक्तव्य गौतम गंभीरनं केलं आहे. दिनेश कार्तिक सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुरेश रैना हा टी-२० क्रिकेटमध्ये आक्रमक आहे. त्यामुळे मी रैनाऐवजी कार्तिकला टीममध्ये घेतलं असतं. कार्तिक असल्यामुळे टीम आणखी मजबूत होते आणि टीमला आणखी पर्याय मिळतात, असं गंभीर म्हणाला. कार्तिक हा स्पिन आणि फास्ट बॉलिंग दोन्ही चांगली खेळू शकतो तसंच शेवटच्या काही ओव्हरमध्ये कार्तिक आक्रमण करू शकतो, अशी प्रतिक्रिया गंभीरनं दिली.


केदार जाधव फिट झाल्यानंतरही सुरेश रैनाला टीममध्ये संधी देण्यात येणार आहे का? कारण केदार जाधव बॉलिंगचाही पर्याय देत असल्याचं गंभीरनं सांगितलं. सुरेश रैनाचा सहावा बॉलर म्हणून विचार करण्यात येत आहे का? फक्त बॅट्समन म्हणून रैनाला संधी देण्यात येत असेल तर कार्तिक टीममध्ये हवा, असं मत गंभीरनं मांडलं.