मुंबई : बोरूसिया मोनशेनग्लाबाखचा स्ट्राइकर मार्कस थुरमला (BORUSSIA MONCHENGLADBACH forward Marcus Thuram) बुंदेसलीगा फुटबॉल टूर्नामेंट मॅचच्या दरम्यान होफेनहीम टीमच्या खेळाडूवर थुंकल्यामुळे मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर्मन फुटबॉल महासंघने सोमवारी हा प्रतिबंध जर्मन कप आणि बुंदेसलीगामध्ये लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडूने दुसऱ्या खेळाडूवर थुंकल्यामुळे पाच सामन्यांवर प्रतिबंध लावण्यात आली आहे. थुरमवर आणखी एका सामन्याचा निलंबित प्रतिबंध असणार आहे. २१ डिसेंबर २०२१ पर्यंत चांगल्या वागणुकीवर अवलंबून असणार आहे. टॅकलवरून वाद झाल्यानंतर थुरमने डिफेंडर स्टीफन पोशच्या (23-year-old spat in Posch face) चेहऱ्यावर थुंकलं होतं.



रेफरी फ्रँक विलेनबर्गने व्हिडिओ पाहिल्यानंतर थुरमला मैदानातून बाहेर पाठवलं आणि पोशला पिवळ्या रंगाचं कार्ड देण्यात आलं. होफेनहीमने शनिवारी हा सामना झाला यामध्ये २-१ असे स्कोअर झाला. महासंघाने सोमवारी थुरमवर ४० हजार युरो म्हणजे ५० हजार डॉलरचा जुर्माना लावण्यात आला. ज्याला सामाजिक कार्याला दान केले जाणार आहे.